
आंतर विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० क्रिकेट स्पर्धेत होणार सहभागी
नागपूर (सतीश भालेराव) ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० क्रिकेट स्पर्धेसाठी या चमूची निवड करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या संघामध्ये कुलसचिव कार्यालयातील दुर्गेश बैस यांची यष्टीरक्षक म्हणून तर फलंदाज म्हणून परीक्षा व मूल्यमापन मंडळातील ईश्वर कुटे, धीरज पाठक, भांडार विभागातील निलेश रोटके, आस्थापना विभागातील अक्षय राऊत, गोलंदाज म्हणून मुद्रण व प्रकाशन विभागातील रितेश कांबळे, अष्टपैलू खेळाडू म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील सुरज सूर्यवंशी, विद्या विभागातील रितेश पुरकाम, औषधीशास्त्र विभागातील महेंद्र बनकर, विद्यार्थी वसतीगृहातील समीर दाणे, विद्यापीठ विकास विभागातील निनाद राऊत, सामान्य प्रशासन विभागातील श्रीराम खरे, गोपनीय विभागातील रमेश शेवारे, सामान्य प्रशासन विभागातील दीपक घोडमारे, अतिरिक्त खेळाडू फलंदाज म्हणून व्यावसायिक परीक्षा विभागातील सचिन जांबुतकर, वनस्पतीशास्त्र विभागातील सुनील वासे यांचा संघामध्ये समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून दिनेश दखणे, प्रशिक्षक म्हणून राकेश कोपुलवार, संघ निरीक्षक म्हणून दर्पण गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या संघाला प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे (चवरे), कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यापीठ कर्मचारी क्रिकेट संघ
दुर्गेश बैस, ईश्वर कुटे, धीरजव पाठक, निलेश रोटके, अक्षय राऊत, रितेश कांबळे, सुरज सूर्यवंशी, रितेश पुरकाम, महेंद्र बनकर, समीर दाणे, निनाद राऊत, श्रीराम खरे, रमेश शेवारे, दीपक घोडमारे, सचिन जांबुतकर, सुनील वासे. संघ व्यवस्थपाक – दिनेश दखणे, प्रशिक्षक – राकेश कोपुलवार.