< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); माही बहुउद्देशीय संस्थेतर्फे व्यवसाय मार्गदर्शन शिबीर – Sport Splus

माही बहुउद्देशीय संस्थेतर्फे व्यवसाय मार्गदर्शन शिबीर

  • By admin
  • April 3, 2025
  • 0
  • 143 Views
Spread the love

नागपूर : क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या सौजन्याने माही बहुउद्देशीय शिक्षण संस्था युवक व युवती कल्याण व्यवसाय मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.

कोलीतमारा पारशिवनी येथे तीन दिवसीय आदिवासी युवक व युवतींसाठी माही बहुउद्देशीय शिक्षण संस्था अध्यक्ष सोनु विजय चुटे यांच्या मार्फत व्यवसाय मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमात व्यवसाय मार्गदर्शक अजय गायकी यांच्या हस्ते शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच किस्म अतू उईके तसेच रमेश गोमासे, चित्राताई निंबुलकर, सुरेखाताई कुंभरे, सुनील बजाईत इत्यादी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. रोजगारभिमुख योजनेची माहिती युवकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, कमी भांडवलात रोजगार कसा उभारणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. गरीब जनतेला या विविध योजनांचा लाभ व्हावा यासाठी अगरबत्ती, मेणबत्ती, पापड, लोणचे, शिवणकाम, ब्यूटी पार्लर व्यवसाय, कम्प्युटर, फुलवाती, कापडी बॅग, कागदपत्र पॅकेट तयार करणे अशा अनेक व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शक करण्यात आले. या शिबिरात २५ आदिवासी युवक व युवती लाभार्थी होते. तीन दिवसीय व्यवसाय मार्गदर्शन शिबिराची यशस्वी सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *