छत्रपती संभाजीनगर संघाचा निर्णायक विजय हुकला

  • By admin
  • April 3, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

जय हारदे, श्रीनिवास लेहेकर, श्रीवत्स कुलकर्णी, राघव नाईकची चमकदार कामगिरी

छत्रपती संभाजीनगर : श्रीवत्स कुलकर्णी, जय हारदे, श्रीनिवास लेहेकर, राघव नाईक यांच्या लक्षवेधक कामगिरीच्या बळावर छत्रपती संभाजीनगर संघाने एमसीए अंडर १९ दोन दिवसीय क्रिकेट लीग स्पर्धेत नांदेड संघावर निर्णायक विजय नोंदवण्याची संधी थोडक्यात हुकली. मात्र, छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर बाजी मारली.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. छत्रपती संभाजीनगर संघ विजयाच्या मार्गावर होता. सामना संपला तेव्हा छत्रपती संभाजीनगर संघास फक्त आठ धावांची गरज होती. ८ षटकात छत्रपती संभाजीनगर संघाने पाच बाद ६६ धावा काढल्या. मात्र, अवघ्या ८ धावांच्या फरकाने निर्णायक विजयाने छत्रपती संभाजीनगर संघाला हुलकावणी दिली.

राम राठोड याने दोन षटकार व तीन चौकारांसह ३२ धावा फटकावल्या. जय हारदे (५), सुमित सोळुंके (१०), श्रीवत्स कुलकर्णी (२), राघव नाईक (१) हे फलंदाज झटपट बाद झाले. रुद्राक्ष बोडके (३) व श्रीनिवास लेहेकर (०) हे नाबाद राहिले. आर्यन मुंडे याने २३ धावांत दोन तर अफताफ सय्यद याने ३५ धावांत एक गडी बाद केला. जय हारदे हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक : छत्रपती संभाजीनगर : पहिला डाव : ७२.३ षटकात नऊ बाद ३२५ डाव घोषित (श्रीवत्स कुलकर्णी ९७, राघव नाईक ५२, जय हारदे २५, श्रीनिवास लेहेकर २४, रुद्राक्ष बोडके ४२, राम राठोड ३९, आदित्य घोगरे ३-८९, अमेय जाधव ३-४३, रेहान रामजानी (२-८९).

नांदेड : पहिला डाव : ३९.५ षटकात सर्वबाद २०३ (आदित्य घोगरे ५४, आर्यन मुंडे ४२, श्रीनिवास लेहेकर ४-३८, जय हारदे ३-४१, श्रीवत्स कुलकर्णी २-४५, जैद पटेल १-३०).

नांदेड : दुसरा डाव (फॉलोऑन) : ४०.२ षटकात सर्वबाद १९५ (आदित्य घोगरे ४३, हर्षमीत सिंग कापसे ५१, आर्यन मुंडे २१, अमेय जाधव १९, शंभू काळे १७, जय हारदे ६-८४, श्रीनिवास लेहेकर ३-६०, अविनाश मोटे १-१२).

छत्रपती संभाजीनगर : दुसरा डाव : ८ षटकात पाच बाद ६६ (जय हारदे ५, सुमित सोळुंके १०, राम राठोड ३२, श्रीवत्स कुलकर्णी २, राघव नाईक १, रुद्राक्ष बोडके नाबाद ३, श्रीनिवास लेहेकर नाबाद ०, आर्यन मुंडे २-२३, अफताफ १-३५). सामनावीर : जय हारदे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *