कॅडेन्स सीनियर पुरुष संघाला विजेतेपद 

  • By admin
  • April 4, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

दिग्विजय पाटील, हर्षल काटे, किरण चोरमले, अक्षय वाईकरची लक्षवेधक कामगिरी 

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए सीनियर निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्स संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजेतेपद पटकावले. कॅडेन्स आणि जेट्स यांच्यातील अंतिम सामना अनिर्णित राहिला.

 गहुंजे येथील एमजीए २ मैदानावर हा अंतिम सामना झाला. कॅडेन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅडेन्स संघाने १२५.१ षटके फलंदाजी करत सर्वबाद ४०४ धावसंख्या उभारली. त्यानंतर जेट्स संघाने ८९.४ षटकात सर्वबाद २१३ धावा काढल्या. कॅडेन्स संघाने दुसऱया डावात सात षटकात एक बाद २६ फटकावत डाव घोषित केला.

या सामन्यात दिग्विजय पाटील याने शानदार शतक झळकावले. दिग्विजय याने २४७ चेंडूंचा सामना करत १४७ धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याने एक षटकार व १९ चौकार मारले. हर्षल काटे याने १३३ चेंडूंचा सामना करताना ८५ धावा फटकावल्या. हर्षल याने ११ चौकार व एक षटकार मारला. किरण चोरमले याने १३४ चेंडूत ८५ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. त्याने एक षटकार व सोळा चौकार ठोकले. गोलंदाजीत अक्षय वाईकर याने ४८ धावांत सहा विकेट घेऊन सामना गाजवला. निकित धुमाळ याने ५७ धावांत तीन बळी घेतले. अथर्व चौधरी याने ६० धावांत दोन गडी बाद केले.
 
संक्षिप्त धावफलक ः कॅडेन्स संघ ः पहिला डाव ः १२५.१ षटकात सर्वबाद ४०४ (दिग्विजय पाटील १४७, हर्षल काटे ८५, कौशल तांबे ६२, अक्षय वाईकर ३८, अथर्व धर्माधिकारी २१, सौरभ नवले १५, अथर्व चौधरी १५, निकित चौधरी ३-५७, दिव्यांग हिंगणेकर २-८९, किरण चोरमले २-२३). 

जेट्स संघ ः पहिला डाव ः ८९.४ षटकात सर्वबाद २१३ (किरण चोरमले ८५, धीरज फटांगडे २४, जय पांडे २८, अझीम काझी १३, साहिल चुरी २३, योगेश चव्हाण नाबाद १६, अक्षय वाईकर ६-४८, अथर्व चौधरी २-६०, हर्षल काटे १-४८).

कॅडेन्स संघ ः दुसरा डाव ः ७ षटकात एक बाद २६ डाव घोषित (अथर्व धर्माधिकारी नाबाद १५, अनिरुद्ध ४, कौशल तांबे नाबाद ५, निकित चौधरी १-१९). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *