
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनची प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांसमवेत बैठक
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा परिषदेत शासनाकडून आलेली आरटीई प्रतिपूर्ती रक्कम ४३ कोटी रुपये इंग्रजी शाळांच्या बँक खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसात जमा होणार आहेत.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा) संघटनेच्या पदाधिकाऱयांची बैठक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये मेसा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. प्रवीण आव्हाळे यांनी सुरुवातीला आरटीई प्रतिपूर्ती रक्कम वाटपा संदर्भात विचारणा केली असता प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व आरटीई कक्ष अधिकारी संगीता सावळे यांनी मेसा संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना सांगितले की जिल्हा परिषद मध्ये आरटीई प्रतिपूर्ती रक्कम ४३ कोटी शासनाकडून आलेली आहे.

यामध्ये उच्च न्यायालयाने १०० टक्के आरटीई प्रतिपूर्ती रक्कम देण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहे. अशी २४ कोटी रक्कम आली आहे व कोर्टात न गेलेल्या शाळांसाठी २०२२-२३ व २०२३-२४ चे १९ कोटी आरटीई प्रतिपूर्ती रक्कम आलेली आहे. उच्च न्यायालयात ज्या ६० शाळा गेल्या आहेत त्यापैकी १८ शाळांना पहिल्या टप्प्यात आरटीई प्रतिपूर्ती रक्कम वाटप करण्यात आली आहे व राहिलेल्या ४२ शाळांना २ ते ३ दिवसात शाळांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे असे जिल्हा परिषदेचे राजपूत यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर २६९ इंग्रजी शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे आरटीई प्रतिपूर्ती रक्कम १०० टक्के इंग्रजी शाळांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे. या बैठकीला मेसा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा प्रवीण आव्हाळे, राज्य कार्याध्यक्ष हनुमान भोंडवे, राज्य कोषाध्यक्ष डॉ संजय पाटील, राज्य सरचिटणीस संदीप लघामे पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील मगर पाटील, ॲड ऋषिकेश जोशी, रूपाली देशपांडे, प्रियंका राणा, कुलकर्णी, जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.