
वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलची लक्षवेधक कामगिरी
नाशिक : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सीनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलचे खेळाडू करुणा शिंदे, तमन्ना तांबोळी व अक्षदा गोळे यांची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट उपाध्यक्ष विलास गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे, विजय घोटकर उपस्थित होते.
नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल नियम व माहिती सांगितली. जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातून ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला. या संघातील करुणा शिंदे, तमन्ना तांबोळी व अक्षरा गोळे यांची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली.
या निवडीबद्दल भारतीय टेनिस महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व्ही डी व्यवहारे, संस्थेचे विश्वस्त अॅड आप्पासाहेब उगांवकर, रतन पाटील वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, अॅड दिलीप वाघवकर, राजेश सोनी, प्रभाकर कुयटे, मधुकर राऊत विश्वास कराड ,नरेंद्र नांदे, शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी सानप यांनी अभिनंदन केले व पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रशिक्षक सुभाष खाटेकर, क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.