
निफाड (जि. नाशिक) : प्रभू श्रीराम नवमी महोत्सवानिमित्त व क्रीडा सह्याद्री फाउंडेशन आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार व योगासने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळस (रामाचे) च्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. यात शाळेतील ३५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दुसाने यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. जीवनामध्ये सूर्यनमस्कार व योगा किती महत्त्वाचा आहे याबद्दल दुसाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून विलास गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून ५१ सामूहिक सूर्यनमस्कार व योगासने करून घेतले.
उपक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दुसाने, नवनाथ बटवल, मनोज दलाल, दिनेश पाटील, पोपट मोरे, प्रदीप पालवी, लता जाधव, शीला कसबेकर, माधुरी सोनवणे, पल्लवी भडके, रंजना पैठणकर, जयश्री मोरे, मयुरी पंडित आदी उपशिक्षिका, पिंपळस रामाचे सरपंच, उपसरपंच, एसएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व पालक उपस्थित होते.
यावेळी पी ए मोरे यांनी सूत्रसंचालन केले. शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशनचे क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड यांचेही या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.