
गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर यांची माहिती
पुणे ः पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे उद्घाटन रविवारी (६ एप्रिल) होणार आहे. ही गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा समजली जाते.
ही स्पर्धा ६ ते १३ एप्रिल दरम्यान पुण्यात पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ आणि १८० ते २५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेचा पारितोषिक वितरन समारंभ १३ एप्रिल रोजी पुण्यातील प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आणि क्लब येथे पार पडणार असल्याची माहिती गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अनिरुद्ध सेवलीकर पुढे ते म्हणाले की, अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज देशभरातील विविध संघ सहभागी होत आहेत. पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीग २०२५ ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफोर्ड गोल्फ लीग मध्ये पुणेकरांना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय लीगच्या सामन्यासाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे व सर्व यजमान संघाचा नुकताच स्वागत समारंभ पार पडला. या प्रीमियर लीगचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सचे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर यांच्या हस्ते होणार आहे.
या वेळी गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे अनिरुद्ध सेवलेकर, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टचे रोहन सेवलेकर, एस गोल्फिंगचे आदित्य मालपाणी, ऑक्सफर्ड रिसॉर्टचे व्यवस्थापक कौशिल वोरा पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
या लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ईगल फोर्सेस, बिनधास्त बॉईज, सुलतान स्विंग्स, ब्लिस्ट्रिंग बर्ड्स, झिंगर्स, ग्रीन गॅडीटर्स, सुझलोन ग्रीन्स, रोरिंग टायगर्स, पुना लायन्स, सुब्बन सनरायजर्स, द लीगशी क्लब, बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीग स्पर्धा अतिशय चुरशीची आणि रंगतदार होणार असल्याचे आयोजक रोहन सेवलेकर यांनी सांगितले आहे.