
कोलकाता : अष्टपैलू फिरकी गोलंदाज सुनील नरेन याने केकेआर संघासाठी २०० विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. असा पराक्रम करणारा नरेन हा पहिला गोलंदाज बनला आहे.
आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८० धावांनी पराभव केला. केकेआर संघाचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन याने सामन्यात एक विकेट घेत इतिहास रचला. या फ्रँचायझीसाठी २०० विकेट्स पूर्ण करून त्याने एक मोठा विक्रम रचला आहे. लीग क्रिकेटमध्ये एकाच फ्रँचायझीसाठी २०० विकेट्स घेणारा तो जगातील फक्त दुसरा गोलंदाज आहे.
२०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ १२० धावांवर सर्वबाद झाला. वैभव अरोरा याने ट्रॅव्हिस हेड (४) आणि इशान किशन (२) यांच्या रूपात सुरुवातीला दोन विकेट्स घेतल्या. २ धावा काढल्यानंतर अभिषेक शर्माही हर्षित राणाचा बळी ठरला. संघाने अव्वल ३ फलंदाजांच्या विकेट फक्त ९ धावांमध्ये गमावल्या. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या संघाला गुरुवारी केकेआरने मोठा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात फिरकी गोलंदाज सुनील नरेन याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
पहिला गोलंदाज
सुनील नरेन याने सामन्यातील त्याचा एकमेव बळी घेतला, तो कामिंदू मेंडिसचा. दहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने मेंडिसची विकेट घेतली. मेंडिसने २० चेंडूत २७ धावा केल्या. या विकेटसह, सुनील नरेन याने केकेआर फ्रँचायझीसाठी २०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. सुनील नरेनने आयपीएलमध्ये केकेआरसाठी १८२ धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच फ्रँचायझीसाठी चॅम्पियन्स लीग टी २० मध्ये त्याच्या नावावर १८ विकेट्स आहेत.
जागतिक क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा दुसरा गोलंदाज
एकाच फ्रँचायझी संघासाठी २०० बळी घेणारा सुनील नरेन हा जागतिक क्रिकेटमधील दुसरा गोलंदाज ठरला आहे. पटेल यांनी त्यांच्या आधीही हे केले आहे. त्याने नॉटिंगहॅमशायर संघासाठी २०८ विकेट्स घेतल्या आहेत.
या शानदार विजयानंतर, कोलकाता नाईट रायडर्स पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, तर पूर्वी ते तळाशी (१० व्या) होते. केकेआरचा हा ४ सामन्यांतील दुसरा विजय आहे. केकेआरचा पुढील सामना ८ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आहे.