
युनिव्हर्सल वन-डे लीग ः कृष्णा फसाटे, साई साळुंखेची लक्षवेधक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १६ एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत अपेक्स क्रिकेट अकादमी संघाने चॅम्पियन क्रिकेट अकादमी संघावर चार विकेट राखून विजय संपादन केला. या सामन्यात कृष्णा फसाटे याने सामनावीर किताब पटकावला.

युनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. चॅम्पियन क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४०.५ षटकात सर्वबाद १४५ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना अपेक्स क्रिकेट अकादमी संघाने ३१.१ षटकात सहा बाद १४६ धावा फटकावत चार विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात साई याने शानदार अर्धशतक साजरे केले. साई याने १०४ चेंडूंचा सामना करत ५१ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार मारले. चिन्मय श्रीवास्तव याने ४४ चेंडूत ४६ धावांची आक्रमक खेळी साकरली. त्याने सात चौकार मारले. विनित अक्कर याने ३९ चेंडूत ३२ धावांची वेगवान खेळी केली. त्याने सहा चौकार मारले. गोलंदाजीत कृष्णा फसाटे याने ५ षटके गोलंदाजी करताना १४ धावांच्या मोबद्लयात तीन विकेट घेऊन सामना गाजवला. सोहम याने २३ धावांत दोन गडी बाद केले. सिद्धार्थय ने ४१ धावांत दोन बळी मिळवले.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक राहुल पाटील यांनी युवा क्रिकेटपटूंना एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव मिळावा या उद्देशाने ५० षटकांची लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या सामन्यात कृष्णा फसाटे याने सामनावीर तर साई साळुंखे याने फायटर ऑफ द मॅच पुरस्कार संपादन केला आहे.
संक्षिप्त धावफलक ः चॅम्पियन क्रिकेट अकादमी ः ४०.५ षटकात सर्वबाद १४५ (इशांत बाबीरवाल १३, साई नाबाद ५१, चिन्मय श्रीवास्तव ४६, इतर १९, कृष्णा फसाटे ३-१४, सिद्धार्थ २-४१, शौर्य पाटील १-१३, ओम कोल्पेकवार १-१७) पराभूत विरुद्ध अपेक्स क्रिकेट अकादमी ः ३१.१ षटकात सहा बाद १४६ (वेदांत कुलकर्णी ८, विनित अक्कर ३२, रुशी वाघमोडे ७, मोहित कुमार नायडू ७, प्रत्युष गर्ग नाबाद २०, सिद्धार्थ १६, ओम कोल्पेकवार नाबाद ९, इतर ४६, सोहम २-२३, समर्थ जोशी १-१८, सुयोग १-१५, व्योम जैन १-१०). सामनावीर ः कृष्णा फसाटे.