
गुरुकुल अकादमी क्रिकेट ः अर्जुन जोशी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः गुरुकुल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित आंतर अकादमी लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुकुल सनरायझर्स संघाने गुरुकुल जायंट्स संघावर चुरशीच्या लढतीत एक विकेट राखून विजय नोंदवला. अर्जुन जोशी सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

डी वाय पाटील क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. गुरुकुल जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात नऊ बाद ९९ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात गुरुकुल सनरायझर्स संघाने १८.१ षटकात १०१ धावा फटकावत एक विकेटने सामना जिंकला.

या सामन्यात जयंत पांडे याने १४ चेंडूत ३४ धावांची वेगवान खेळी केली. त्याने तीन उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. शौर्य अग्रवाल याने २७ चेंडूत २३ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार मारले. आदित्य श्रीमाळी याने तीन चौकारांसह १६ धावांची आक्रमक खेळी केली. गोलंदाजीत अर्जुन जोशी याने अवघ्या पाच धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. श्लोक देशमुख याने १४ धावांत तीन गडी बाद केले. आयुष बुगडे याने २४ धावांत तीन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक ः गुरुकुल जायंट्स ः २० षटकात नऊ बाद ९९ (आऱव लोढा ५, श्लोक देशमुख १४, रुही नाबाद ९, जयंत पांडे ३४, आयुष बुगडे ८, जसराज सिंग नाबाद ५, इतर १८, अर्जुन जोशी ४-५, लवेश जैस्वाल २-९, शौर्य अग्रवाल १-१५, रबमीत सिंग सोधी १-३४, आदित्य श्रीमाळी १-४) पराभूत विरुद्ध गुरुकुल सनरायझर्स ः १८.१ षटकात ११-१०१ (शौर्य अग्रवाल २३, लवेश जैस्वाल ६, अनिल कर्डिले ८, आदित्य श्रीमाळी १६, रबमीत सिंग सोधी नाबाद ११, इतर ३०, श्लोक देशमुख ३-१४, आयुष बुगडे ३-२४, आयुष २-७, साद शेख १-१२, जसराज सिंग १-१७). सामनावीर ः अर्जुन जोशी.