गुड इयर, कॉस्मो फिल्म्स, महावितरण संघांचे मोठे विजय 

  • By admin
  • April 5, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

शहीद भगतसिंग औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : सचिन शेंडगे, विराज चितळे, स्वप्नील चव्हाण सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर : ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत गुड इयर, कॉस्मो फिल्म्स, महावितरण अ या संघांनी दणदणीत विजय साकारत आगेकूच केली. या लढतींत भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार सचिन शेंडगे, विराज चितळे व स्वप्नील चव्हाण यांनी संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. पहिला सामना गुड इयर व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यात खेळविण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात ९ बाद ८० धावा केल्या. यामध्ये कुणाल मिसाळ याने ३० चेंडूत २ चौकारांसह १९ धावा तर अतुल बोर्डे याने १९ चेंडूत २ चौकारांसह १७ धावांचे योगदान दिले. तर बाकीचे फलंदाज धावांचा दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. 

गुड इयर संघातर्फे सचिन शेंडगे याने भेदक गोलंदाजी करत केवळ १३ धावा ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तर सागर दुबे याने १५ धावात २ गडी, परवेझ सय्यद याने ५ धावात १ गडी तर कर्णधार जितेंद्र निकम याने १३ धावात १ गडी बाद केला. 

प्रत्युत्तरात गुड इयर संघाने विजयी लक्ष केवळ ९ षटकात ३ गड्यांच्या पूर्ण केले. यामध्ये सचिन शेंडगे याने अप्रतिम खेळी करताना केवळ ३५ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ११ चौकारांसह ६७ धावा, परवेझ सय्यद व सागर दुबे यांनी अनुक्रमे ५ व ४ धावांचे योगदान दिले. 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार सचिन भालेराव याने १३ धावांत २ गडी तर राजेंद्र म्हस्के याने २८ धावात १ गडी बाद केला.

दुसरा सामना कॉस्मो फिल्म्स व डीआयएजीओ या संघा दरम्यान खेळविण्यात आला. डीआयएजीओ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला कॉस्मो फिल्म्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद २४० धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये कर्णधार विराज चितळे याने अप्रतिम फलंदाजी करताना केवळ ३७ चेंडूत ५ उत्तुंग षटकार व २ चौकारांसह ५५ धावा फटकावल्या. अमोल नागरे याने ३१ चेंडूत २ षटकार व ६ चौकारांसह ४७ धावा, भास्कर जिवरक याने १९ धावात ५ उत्तुंग षटकार व १ चौकारासह ४६ धावा तर सतीश भुजंगे याने २२ चेंडूत १ षटकार व ५ चौकारांसह ३८ धावांचे योगदान दिले. 

डीआयएजीओ संघातर्फे गोलंदाजी करताना सौरभ शिंदे याने ४७ धावात २ गडी तर रोहिदास गायकवाड, आकाश अभंग व समर्थ राज यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 


प्रत्युत्तरात डीआयएजीओ संघ निर्धारित २० षटकात ६ बाद १३९ धावाच करू शकला. यामध्ये राहुल गायकवाड याने सर्वाधिक ३५ चेंडूत ६ षटकार व २ चौकारांसह ५७ धावा, आकाश अभंग याने २८ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २८ धावा, सम्राट राज याने १२ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह १५ धावा तर अभिजीत मुंडे याने १३ चेंडूत २ चौकारांसह १२ धावांचे योगदान दिले. 

कॉस्मो फिल्म्स संघातर्फे गोलंदाजी करताना रामेश्वर मतसागर, समर्थ जीवरग व कर्णधार विराज चितळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तिसरा सामना महावितरण ‘अ’ व इंडियन मेडिकल असोसिएशन या संघा दरम्यान खेळविण्यात आला. महावितरण अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १९९ धावा केल्या. यामध्ये स्वप्नील चव्हाण याने ३८ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ८ चौकारांसह ७० धावा, ज्ञानेश्वर पाटील याने ५१ चेंडूत ५ उत्तुंग षटकार व ५ चौकारांसह ६९ धावा, पांडुरंग धांडे याने १२ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह २२ धावा तर प्रवीण क्षीरसागर व शाहेद सिद्दिकी यांनी प्रत्येकी १६ व १२ धावांचे योगदान दिले. 

इंडियन मेडिकल असोसिएशन संघातर्फे गोलंदाजी करताना अर्रसलम पटेल याने ३० धावात ४ महत्वपूर्ण गडी बाद केले तर मशदुल सय्यद याने ३७ धावात २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात, इंडियन मेडिकल असोसिएशन संघ १८ षटकात सर्वबाद ९० धावाच करू शकला. यामध्ये जावेद हाश्मी याने ३४ चेंडूत ५ चौकरांसह ३१ धावा, मशदुल सय्यद याने १५ चेंडूत ४ चौकारांसह १४ धावांचे योगदान दिले तर बाकीचे फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाही. 

महावितरण अ संघातर्फे गोलंदाजी करताना कैलास शेळके याने २६ धावांत ३ गडी, महेश गट्टूवार याने १४ धावात ३ गडी, प्रवीण क्षीरसागर याने १३ धावात २ गडी तर स्वप्नील चव्हाण व कृषण साळवे आणि प्रत्येकी १ गडी बाद केला.
 

या सामन्यांत पंचाची भूमिका राजेश चांदेकर, विशाल चव्हाण, कमलेश यादव, अजय देशपांडे आणि गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.

रविवारी होणारे सामने

कॅनेरा बँक व बजाज ऑटो (सकाळी ८ वाजता)

एआयटीजी व वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ (सकाळी ११ वाजता)

सेंट्रल बँक व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर (दुपारी २ वाजता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *