
चेन्नई ः चेन्नई सुपर किंग्ज संघाची खराब कामगिरी, महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. धोनी आयपीएल स्पर्धेतून कधी निवृत्त होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. या प्रश्नाचे थेट उत्तर महेंद्रसिंग धोनी याने दिले आहे. जुलैमध्ये मी ४४ वर्षांचा होईन. त्यानंतर माझ्याकडे आयपीएलमधून निवृत्तीबद्दल विचार करण्यासाठी १० महिने असतील असे धोनीने सांगून तूर्तास तरी हा प्रश्न त्याने मागे टाकला आहे.
धोनी हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि त्याचे आकर्षण अजूनही आयपीएलमध्ये कायम आहे. धोनी क्वचितच मुलाखती देतो आणि त्यामुळेच सामान्य जनता, पत्रकार आणि पॉडकास्टर्समध्ये त्याची खूप मागणी आहे. तथापि, आता हे सर्व बदलणार आहे असे दिसते, कारण एमएस धोनीने स्वतःचे अॅप लाँच केले आहे जिथे लोकांना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती मिळू शकेल. त्याच वेळी, धोनीने त्याची पहिली मुलाखत दिली जी आता धोनी अॅपवर उपलब्ध आहे. धोनीने कंटेंट क्रिएटर राज शमानी यांची मुलाखत घेतली आहे. धोनीने राज शमानीच्या पॉडकास्टवर त्याच्या निवृत्तीबद्दल बोलले आहे.
धोनीने मुलाखतीत त्याच्या निवृत्तीबद्दलही सांगितले की, बघा, सध्या नाही, हो मी एका वेळी फक्त एकच काम करतो, सध्या आयपीएल आहे. मी सर्वकाही खूप सोपे ठेवतो, मी जास्त विचार करत नाही, वर्षानुवर्षे मी पुढे जात राहतो, मी भविष्याबद्दल विचार करत नाही. मी सध्या ४३ वर्षांचा आहे, मी जुलैमध्ये ४४ वर्षांचा होईन, त्यानंतर माझ्याकडे आयपीएलमधून निवृत्तीबद्दल विचार करण्यासाठी १० महिने असतील.”
धोनी पुढे म्हणाला की, “मी आणखी एक वर्ष खेळावे की नाही, हे निवृत्तीबद्दल मला ठरवायचे नाही. वर्षातून एकदा तुमचे शरीर तुम्हाला पुढे खेळू शकते की नाही हे सांगते… काय होते ते पाहूया. ८ ते १० महिन्यांचा कालावधी असतो.”
चेन्नई सुपर किंग्जच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान चेपॉक स्टेडियमवर धोनीच्या पालकांची (पान सिंग आणि देवकी देवी) उपस्थितीमुळे त्याच्या निवृत्तीबद्दलच्या अटकळांना पुन्हा एकदा उधाण आले होते, परंतु आता धोनीची मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत धोनीने निवृत्तीबाबत आपले मत मांडले आहे. धोनीची ही मुलाखत चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहे.