पहिली ‘वासू परांजपे कप’ क्रिकेट स्पर्धा सोमवारपासून रंगणार

  • By admin
  • April 6, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

मुंबई : दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनतर्फे आयोजित पहिली ‘वासू परांजपे कप’ क्रिकेट स्पर्धा ७ एप्रिलपासून माटुंग्याच्या वीर दडकर मैदानावर सुरुवात होणार आहे. १३ वर्षांखालील होतकरू क्रिकेटपटूंना आपल्या कौशल्याची चुणूक दाखवण्याची ही मोठी संधी आहे.

या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील संघांना प्रत्येकी ३५ षटकांचे तीन साखळी सामने खेळण्याची संधी मिळेल. साखळी फेरीतील सर्वोत्तम कामगिरी करणारे दोन संघ ११ एप्रिल रोजी अंतिम फेरीत आमने-सामने भिडणार आहेत.

स्पर्धेचे उद्दिष्ट युवा खेळाडूंना दर्जेदार स्पर्धात्मक अनुभव देणे तसेच त्यांच्यातील सुप्त कौशल्यांना वाव मिळवून देणे हे आहे. दिलीप वेंगसरकर फौंडेशनने आतापर्यंत मुंबईतील क्रिकेट प्रतिभेला आकार देण्यासाठी अनेक उपक्रम घेतले आहेत, आणि ही स्पर्धा त्या कार्याचा आणखी एक टप्पा ठरणार आहे.

मुंबई क्रिकेटच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक वासू परांजपे यांच्या नावाने ही स्पर्धा घेण्यात येत असल्याने या स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

७ एप्रिलपासून वीर दडकर मैदानावर क्रिकेटची रंगत पाहायला मिळणार असून, मुंबईतील लहानग्या क्रिकेटपटूंच्या खेळातील चमकते तारे निश्चित लक्ष वेधून घेतील यात शंकाच नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *