
मुंबई : मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन, बोरिवली यांच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहयोगाने आयोजित १० वी एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा १८ ते २० एप्रिल या कालावधीत मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन, प्रेमनगर, बोरिवली (पूर्व) येथे खेळविण्यात येणार आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुरुष एकेरी आणि महिला एकेरी या दोन गटांत राज्यभरातील नामवंत खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १,१०,००० ची रोख पारितोषिके आणि आकर्षक चषक आयोजकांकडून प्रदान करण्यात येणार आहेत.
नोंदणी प्रक्रिया सुरू
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी ८ एप्रिल २०२५ पर्यंत आपले प्रवेश अर्ज संबंधित जिल्हा संघटनेमार्फत सादर करावेत. प्रवेश अर्ज आणि अधिक माहिती www.maharashtracarromassociation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ९९८७०४५४२९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी जाहीर केले आहे.