जळगाव येथे मुख्याध्यापक, क्रीडा संचालक, क्रीडा शिक्षक पुरस्कार सोहळा जल्लोषात

  • By admin
  • April 7, 2025
  • 0
  • 79 Views
Spread the love

जळगाव ः जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा जीवन गौरव, विभागीय आदर्श मुख्याध्यापक, विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक, जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक व आदर्श जिल्हा क्रीडा संचालक पुरस्कार सोहळा गोदावरी फाऊंडेशनचे इंजिनियरिंग कॉलेज सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला. यावर्षीपासून क्रीडा संचालक पुरस्काराचा समावेश करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील, महानगरपालिका क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ प्रदीप तळवेलकर, डॉ अक्षय बाविस्कर, विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, मुख्याध्यापक के यू पाटील, मुख्याध्यापक कांचन नारखेडे, प्राचार्य सुषमा शाह, प्रा इकबाल मिर्झा, धुळे जिल्हा अध्यक्ष डॉ आनंद पवार, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डॉ मयुर ठाकरे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले. राज्य गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. राज्य गीत व स्वागत गीत संगीत शिक्षक पंकज पाटील यांनी सादर केले. क्रीडा क्षेत्रासाठी अनमोल योगदान देणारे जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी दोन मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांना विभागीय आदर्श मुख्याध्यापक व आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारसाठी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते.

प्राचार्य डॉ चांदखान पठाण, मुख्याध्यापक सचिन महाजन, मुख्याध्यापिका कांचन नारखेडे, डॉ कांचन विसपुते, डॉ रणजित पाटील, प्रा हरीश शेळके यांच्या निवड समितीने छाननी करून निवड यादी जाहीर केली होती. यात क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रशांत जगताप तर आदर्श क्रीडा संचालक पुरस्काराने एम जे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आणि एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकृष्ण बेलोरकर व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ पी आर चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कांचन विसपुते यांनी केले. डॉ आनंद पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व सचिव यांची विशेष उपस्थिती होती. शाल, सन्मानपत्र, प्रमाणपत्र देवून पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. तर डॉ मेघराज महाले, डॉ आसिफ खान, संगीत शिक्षक पंकज पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सचिन महाजन, प्रा हरीश शेळके, डॉ आसिफ खान, देविदास महाजन, गिरीश पाटील, सचिन सूर्यवंशी, जयश्री माळी, के एस पाटील, धीरज जावळे, जितेंद्र फीरके, विजय विसपुते, मयुर महाजन, संदीप पवार, सुनील वाघ, युवराज माळी, मनोज शिंगाने यांच्यासह जिल्हा क्रीडा कार्यालय व गोदावरी फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले.

विभागीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
संजय पांडुरंग चव्हाण (नाशिक), संजय लोटनराव पवार. (धुळे), फादर जॉय व्हेटोली सी एम आय (धुळे), लक्ष्मण सुका तायडे (जळगाव), चंद्रशेखर रामसिंग पाटील (जळगाव), सुषमा शाह (नंदुरबार), नूतनवर्षा वळवी (नंदुरबार).

विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
किशोर गणेश राजगुरू (नाशिक), राजाराम विठोबा पोटे (नाशिक), डॉ भूपेंद्र रामदास मालपुरे (धुळे), विजय एकनाथ सिसोदे (धुळे), निलेश श्रीराम पाटील (मेहरूण), योगेश शशिकांत सोनवणे (जळगाव), प्रवीण वसंतराव पाटील (जळगाव), युवराज एकनाथ पाटील (नंदूरबार), जगदीश काशिनाथ बच्छाव (नंदुरबार).

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
प्रशांत राजाराम जगताप (क्रीडा जीवन गौरव), डॉ श्रीकृष्ण हरीचंद्र बेलोरकर व डॉ पी आर चौधरी (आदर्श क्रीडा संचालक), समिधा संदीप सोवनी (जळगाव शहर), अनिल दिनकर महाजन (भुसावळ), युवराज यशवंत पाटील (यावल), अजय देवलाल महाजन (रावेर), अनिल नगराम चव्हाण (मुक्ताईनगर), अमितकुमार दिलीप पाटील (भडगाव), प्रवीण धनराज पाटील (जामनेर), गणेश नारायण पाटील (पाचोरा), विजय तात्यासाहेब शितोळे (चाळीसगाव), उमेश भिलाजीराव पाटील (पारोळा), साहेबराव हिलाल पाटील (एरंडोल), रोहिदास भावलाल महाले (धरणगाव), अशोक माणिकराव साळुंखे (चोपडा), लिलाधर लोटू बाविस्कर (शहर), संजय कौतिक काटोले (जळगाव तालुका), मुख्तार अहमद सैय्यद मुश्ताक (शहर), याकूब इस्माईल शेख (भुसावळ), योगेश मधुकर पाटील (अमळनेर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *