
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागात राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ संदीप जगताप हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धी साखर कारखान्याचे संचालक व लातूर जिल्हा डॉजबॉल संघटनेचे अध्यक्ष अविनाश जाधव पाटील, प्राचार्य नितीन राठोड, राज्य संघटनेचे महासचिव प्रा एकनाथ साळुंके, व्हॉलीबॉल प्रशिक्षक अभिजीत दिखत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी आर खैरनार यांनी केले.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा राज्य सहसचिव प्रा रमेश शिंदे, संगम डंगर, उपाध्यक्ष महेंद्र कुमार मोटघरे, लातूर सचिव असद शेख, धाराशिव सचिव मोहम्मद रफी, जळगाव सहसचिव कल्पेश चौधरी, अनिकेत नैताम, उपाध्यक्ष गणपत पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
ज्युनियर मुले गटात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, जालना या संघांनी आपल्या गटांमध्ये अग्रक्रम मिळवला. ज्युनियर मुलींच्या गटात छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रायगड ॲकॅडमी, धाराशिव या संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
पुरुष गटात नाशिक किर्डक ॲकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, जालना, रायगड यांनी यश संपादन केले. महिला गटात छत्रपती संभाजीनगर, रायगड, लातूर, धाराशिव या संघांनी आपल्या गटांमध्ये अग्रक्रम पटकावला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन सचिव अभिजीत एकनाथ साळुंके, डी आर खैरनार, गणपत पवार, अर्शद पठाण, यशवंत पाटील, आशिष कान्हेड, मयुरी गायके, अर्शिया शेख यांनी पुढाकार घेतला आहे.
या स्पर्धेत पंच म्हणून सागर तांबे, मयुरी गायके, निखिल मस्के, साहिल देशमुख, रविराज आडे, अक्षय डेंगळे, कैलास वीर, अश्वजीत गायकवाड, कुणाल राठोड, अर्शिया खान, पांडुरंग कदम, मनीषा सूर्यवंशी, हर्षद शेख, पवन धनगर, विजय चव्हाण, अविनाश लिंबोडे, आदित्य मुंदे, राकेश वानखडे, आर्यन वाहून, आकांक्षा मोरे, राकेश म्हात्रे यांनी काम पाहिले.