शाळा तिथे क्रीडा शिक्षक ठराव शिर्डी अधिवेशनात मांडणार

  • By admin
  • April 7, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

दत्तात्रय  मारकड, दिनेश म्हाडगूत यांची माहिती 

सिंधुदुर्ग ः महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे शिर्डी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्हा शाळा तिथे क्रीडा शिक्षक हा ठराव मांडणार असल्याचे राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड आणि सभेचे अध्यक्ष दिनेश म्हाडगूत यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, नाशिक जिल्हा क्रीडा शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती, महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ,अहिल्यानगर. महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ महाराष्ट्र, फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोशिएशन, शारीरिक शिक्षण शिक्षक यूनिट मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने सहयोगी संघटना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षक लोकशाही आघाडी महाराष्ट्र, माध्यमिक शिक्षक महामंडळ महाराष्ट्र, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व क्रीडा भारती महाराष्ट्र महाराष्ट्र क्रीडा विकास परिषद सांगली यांच्या सहकार्याने १२, १३ व १४ एप्रिल रोजी शिर्डी या ठिकाणी शारीरिक शिक्षण शिक्षकांचे दुसरे राज्य अधिवेशन संपन्न होणार आहे.

 या राज्य अधिवेशन संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची सभा नुकतीच माध्यमिक पतपेढीच्या सभागृहातील संपन्न झाली. या सभेत “शाळा तिथे क्रीडा शिक्षक” हा ठराव उपस्थित शिक्षकांनी अधिवेशनात मांडण्याचा निश्चितच केला आहे. ही सभा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य युवा संघटनेचे राज्य सचिव तथा हिर्लोक हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला व्यासपीठावर शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुरान, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, जिल्हा पदाधिकारी संजय पेंढुरकर, विठ्ठल खांडवी, अनिकेत वेतुरेकर, संदेश तुळसणकर, राहुल चौगुले, अंबादास जोफळे, किरसिंग पाडवी, बाळकृष्ण कदम, राष्ट्रीय खेळाडू क्रीडा शिक्षिका माधुरी खराडे, अमोल चौगुले व आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण यांनी स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात शारीरिक शिक्षण शिक्षकांचे शिर्डी येथे होणारे दुसरे राज्य अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी गुगल फॉर्म भरून सहभागी होण्याचे आवाहन केले.

याशिवाय सभेत नुकत्याच नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय मास्टर स्पर्धेत पदक विजेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडा शिक्षक माधुरी खराडे, विठ्ठल खांडवी, शैलेश मुळीक यांचा, कास्ट्राईब शिक्षक संघटना सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पेंढुरकर यांची निवड झाल्याबद्दल तर सुंदर मुख्यमंत्री शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कनेडी प्रशालेचे क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक बयाजी बुराण या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत घेण्यात आला. याशिवाय दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी माधुरी खराडे यांना संघटनेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी करताना ऑनलाइन गुगल फॉर्म भरणे व अधिवेशनासाठी जाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था व आज अधिवेशनाचे महत्त्व  याबाबत सविस्तर विवेचन केले.

शाळा तिथे क्रीडा शिक्षक एकमुखाने ठराव मंजूर
 
“शाळा तिथे क्रीडा शिक्षक”ही मागणी  येत्या राज्य अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्हा ठराव मांडणार असल्याची माहिती सभेचे अध्यक्ष व युवा संघटनेचे राज्य सचिव दिनेश म्हाडगूत यांनी सांगितले व सभेत ठराव घेण्यात आला.

या सभेला उपस्थित क्रीडा शिक्षकांनी अनेक विषयावर सविस्तर चर्चा करून दुसरे अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार केला. अधिवेशन संदर्भात सुसंवाद साधण्यासाठी या ठिकाणी तालुकावार समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीत संदेश तूळसनकर, संजय राठोड, रामचंद्र घावरे, आनंदा जाधव (वैभववाडी तालुका), उत्तरेश्वर लाड, मोहन सनगाळे, आकाश पारकर, बाळासाहेब ढेरे, राजेंद्र गर्जे, रुपेश बांदेकर व सागर फाळके (देवगड तालुका), विठ्ठल खांडवी, निलेश फोंडेकर, अंबादास जोफळे, किरसिंग पाडवी, श्री.तडवी,बाळकृष्ण कदम व अमोल चौगुले (कणकवली तालुका), महेंद्र वारंग, शाम वारंग, शैलेश मुळीक व एन डी पवार (मालवण तालुका), अनिकेत वेतुरेकर, माधुरी खराडे, दीपक तारी (कुडाळ तालुका), किशोर सोनसुलकर, हेमंत गावडे, दीपक बोडेकर (वेंगुर्ला तालुका), रामकृष्ण सावंत, रोहन पाटील, प्रकाश पावरा (सावंतवाडी तालुका), सोमनाथ गोंधळी, संतोष मेथे (दोडामार्ग तालुका) आदींचा समावेश आहे. 
शिर्डी येथे होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षक राज्य अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरणे अत्यावश्यक असून जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांनी लवकरात लवकर भरून घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष बयाजी बुरान व सचिव दिनेश म्हाडगूत यांनी केले आहे. शेवटी संजय पेंढुरकर यांनी आभार  मानून सभेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *