शुभमनने रचला खास विक्रम !

  • By admin
  • April 7, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिल याने अर्धशतक ठोकत संघाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयी कामगिरीत गिल याने एक नवा विक्रम रचला आहे. अशी कामगिरी करणारा गिल हा पहिला फलंदाज बनला आहे. आयपीएलच्या १९ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला. मोहम्मद सिराज याने गुजरातच्या विजयात चमत्कार केला आणि ४ विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. सिराजला सामनावीराचा किताब देण्यात आला. दुसरीकडे, गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने अर्धशतकी खेळी करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. गुजरात टायटन्स संघाच्या विजयात गिल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज बनला आहे. आयपीएलमध्ये असा पराक्रम करून गिलने गुजरातसाठी इतिहास रचला आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इतर कोणताही खेळाडू त्याच्या या खास विक्रमाच्या जवळपासही नाही. गुजरातच्या विजयादरम्यान गिल १३ व्यांदा ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. गुजरातच्या विजयादरम्यान १० पेक्षा जास्त वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा गिल हा पहिला फलंदाज आहे. शुभमन गिलने गुजरात टायटन्ससाठी आतापर्यंत १३ वेळा हा पराक्रम केला आहे.

गुजरात टायटन्स संघासाठी विजयादरम्यान सर्वाधिक ५० प्लस धावसंख्या शुभमन गिल याने (३१ डाव) सर्वाधिक १३व्यांदा केली आहे. त्याच्यानंतर ही कामगिरी साई सुदर्शन (१५ डाव), हार्दिक पंड्या (२१ डाव), रिद्धिमान साहा (२२ डाव) यांनी प्रत्येकी तीनदा अर्धशतक ठोकून केली आहे. विजय शंकर (१३ डाव) व डेव्हिड मिलर (२४ डाव) यांनी गुजरातसाठी दोन अर्धशतके काढली आहेत. जोस बटलर याने तीन डावात एकदा अर्धशतक साजरे केले आहे. याशिवाय शु‌भमन गिलचा आयपीएल कारकिर्दीतील हा २५ वा ५० प्लस स्कोअर आहे. त्याने आतापर्यंत चार शतके आणि २१ अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलच्या इतिहासात वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत गिल सर्वाधिक ५० प्लस धावा करणारा फलंदाज बनला आहे. आतापर्यंत, वयाच्या २५ व्या वर्षी, गिलने आयपीएलमध्ये २५ आणि ५० प्लस धावा करण्यात यश मिळवले आहे. गिलने २०१८ मध्ये (वयाच्या १९ व्या वर्षी) कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती.

दुसरीकडे, शुभमन गिल हा २६ वर्षांच्या आधी ३००० पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू आहे, आतापर्यंत गिलने १०७ सामन्यांमध्ये ३८.२० च्या सरासरीने ३३६२ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात २५ व्या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऋषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने ९८ सामन्यांमध्ये २८३८ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात तीन आणि चार शतके ठोकण्याचा विक्रमही गिलच्या नावावर आहे. २६ वर्षांच्या वयाच्या आधी इतर कोणत्याही फलंदाजाने २ पेक्षा जास्त शतके केलेली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *