
स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट : गणेश जाधव, शोहरब शेख सामनावीर
सोलापूर : रेल्वेच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत वेगवान गोलंदाज गणेश जाधवच्या चार बळींच्या जोरावर टाइम्स इलेवन ब संघाने रायझिंग स्टार क्लबवर ९ गडी राखून विजय मिळविला. गणेश सामन्याचा मानकरी ठरला.

रेल्वे मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात नॅशनल क्रिकेट अकादमी ब संघाने टाइम्स इलेवन अ संघावर १ गडी राखून मात केली. चार बळी टिपणारा वेगवान गोलंदाज शोहरब शेख सामनावीर ठरला. प्रत्येक सामन्याचे सामनावीर पुरस्कार सुदेश मालप व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. सामनावीर पुरस्कार नागेश नवले व लियाकत शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
पंच म्हणून मजहर मंगोली व दयानंद नवले आणि सचिन गायकवाड व चिराग शाह तर गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
१) रायझिंग स्टार: १८.१ षटकांत सर्वबाद १०५ (प्रशांत भट ३०, गजानन पिलगुलवर २४, बिरुबा सलगर १३, गणेश जाधव ४ बळी, सचिन गायकवाड व अयुब पट्टेवाले प्रत्येकी २ बळी) पराभूत विरुद्ध टाइम्स इलेवन ब संघ : १० षटकांत १ बाद १०६ (मकरंद बसवंती नाबाद ५३, इम्तियाज अत्तार ४१, बिरूबा सलगर १ बळी).
२) टाइम्स इलेवन अ संघ : १६.२ षटकांत सर्वबाद ११६ (करण चाकोते ४३, राहुल कचरे २४, प्रतीक बाकळे १७, शोहरब ४ बळी, जयराज मडोळे ३ बळी, अभिजित कुलकर्णी २ बळी) पराभूत विरुद्ध नॅशनल क्रिकेट अकॅडमी ब : १९.१ षटकांत ९ बाद ११७ (रियाज नदाफ ३३, अभिजित कुलकर्णी २१, अजय सिंग १२, राहुल कचरे, करण चाकोते व प्रवीण यादव प्रत्येकी २ बळी).