
१९ सदस्यांचे कुटुंब, वडील शिंपी दुकान चालवतात
हैदराबाद : सध्या सनरायझर्स हैदराबादचा लेग स्पिनर झीशान अन्सारी याची सर्वत्र चर्चा आहे. या २५ वर्षीय तरुण लेग स्पिनरने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच केएल राहुल, फाफ डु प्लेसिस आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांच्या विकेट घेत छाप पाडली.
सनरायझर्स हैदराबादने झीशान अन्सारीला ४० लाख रुपयांना खरेदी केले. या लेग स्पिनरचा जन्म उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झाला. यूपी लीगच्या पहिल्या हंगामात झीशान सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. स्पर्धेत त्याने २४ विकेट घेऊन प्रसिद्धी मिळवली. त्याने ऋषभ पंतसोबत भारताकडून अंडर १९ क्रिकेट देखील खेळले आहे.
झीशान एका साध्या कुटुंबातून येतो. त्याच्या कुटुंबात एकूण १९ सदस्य आहेत. झिशान याचे वडील नईम अन्सारी लखनौमध्ये एक शिंपी दुकान चालवतात. यूपी लीगमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याला यूपीसाठी सय्यद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये संधी मिळाली नाही. झिशानला विकेट घेणारा फिरकी गोलंदाज मानले जाते.
आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी झीशान अन्सारीने त्याच्या राज्यासाठी फक्त एकच टी २० सामना खेळला आहे. २०१६ मध्ये झीशान अंडर १९ खेळला होता. त्याने २०१६ मध्ये ऋषभ पंत, इशान किशन आणि सरफराज खान यांच्यासोबत अंडर १९ क्रिकेट खेळले होते. झीशानने उत्तर प्रदेशकडून पाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. या काळात त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत.
झीशानने त्याच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात झीशान याने एक विकेट घेतली. तथापि, तिसऱ्या सामन्यात त्याला यश मिळाले नाही. कर्णधार पॅट कमिन्सला झीशानवर खूप विश्वास आहे. अॅडम झांपासमोर झीशान अन्सारीलाही खेळवण्यात येत आहे.