
रिलायन्स मॉल, एरंडवणे या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकादमीतर्फे रविवार रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा सिरीज १३ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. ही स्पर्धा रिलायन्स मॉल, एरंडवणे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
पुण्यातील बुद्धिबळ प्रेमींसाठी ही आनंदाची संधी ! व्हिक्टोरियस चेस अकादमीच्या रविवार रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा सिरीजमध्ये खेळाडूंना बुद्धिबळ कौशल्य दाखवण्याची आणि सातत्याने खेळाचा आनंद घेण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी सुंदर ट्रॉफी, बक्षिस आणि पदक यांसह ही स्पर्धा खेळणाऱया सर्व खेळाडूंना एक आनंददायी अनुभव ठरणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना शिकण्याची, खेळण्याची आणि बुद्धिबळाचा आनंद घेण्याची संधी मिळेल.
रिलायन्स मॉल, एरंडवणे हे या स्पर्धेचे अधिकृत स्थळ भागीदार आहेत. या ठिकाणी सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी सोयीस्कर आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देणार आहे.
स्पर्धेची मुख्य वैशिष्ट्ये
ठिकाण : रिलायन्स मॉल, एरंडवणे
तारीख : १३ एप्रिल २०२५ (रविवार)
फॉरमॅट : रॅपिड बुद्धिबळ
बक्षिसे : २०,००० रुपये + आकर्षक ट्रॉफी आणि पदके
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : 8626025502