तिलक वर्माच्या बोटाला दुखावत झाली होती ः हार्दिक

  • By admin
  • April 8, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

मुंबई ः तिलक वर्मा याने या सामन्यात शानदार फलंदाजी केली. गेल्या सामन्यात खूप काही घडले. लोकांनी त्याच्याबद्दल खूप कमेंट केल्या. परंतु, लोकांना हे माहित नाही की त्याच्या बोटाला वेगवान चेंडूमुळे मार लागला होता. त्याला निवृत्त करणे हा एक धोरणात्मक निर्णय होता असे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने सांगितले.

तिलक वर्माच्या बोटात दुखत असल्याने प्रशिक्षकाला वाटले की एका नवीन फलंदाजाने मैदानात जाऊन काम करावे. हा योग्य पर्यार असेल. तथापि, या सामन्यात तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली असे हार्दिकने सांगितले.

मुंबई इंडियन्सना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक नाराज दिसत होता. हार्दिकने संघाच्या पराभवाची कारणे सांगितली आणि शेवटच्या सामन्यात तिलक वर्मा याला निवृत्त करण्याच्या निर्णयाबद्दल देखील सांगितले. हार्दिक म्हणाला की, अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या, पण तिलकच्या बोटाला दुखापत झाली आहे हे कोणालाही माहिती नव्हते. याच कारणामुळे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी हा निर्णय घेतला होता.

हार्दिक म्हणाला, ‘आरसीबी संघाविरुद्धच्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. विकेट खूपच चांगली होती. मी फक्त स्वतःशीच त्याबद्दल बोलत होतो, की पुन्हा एकदा आपण दोन हिट्स कमी पडलो. माझ्याकडे सांगण्यासारखे फार काही नाही. २२१ धावा जास्त नव्हत्या का असे विचारले असता? कर्णधार हार्दिक म्हणाला, ‘विकेट ज्या पद्धतीने होती, त्यामुळे गोलंदाजांना लपण्यासाठी फारशी जागा नव्हती. तथापि, तुम्हाला तिथे तुमचे कौशल्य वापरावे लागले. तुम्ही फलंदाजांना थांबवू शकता, पण मला गोलंदाजांवर कठोर वागायचे नाही. ती एक कठीण खेळपट्टी होती, आमच्याकडे फारसे पर्याय नव्हते.

नमन-रोहितबद्दल हार्दिकचे विधान
नमन धीरला तिसऱ्या क्रमांकाऐवजी खालच्या क्रमांकावर का पाठवण्यात आले असे विचारले असता? कर्णधार हार्दिक म्हणाला, ‘आमच्या संघाचा कणा असलेला नमन नेहमीच खालच्या फळीत फलंदाजी करत आला आहे. फक्त रोहित गेल्या सामन्यात उपलब्ध नव्हता एवढंच. म्हणून आम्हाला कोणालातरी वर पाठवावे लागले. नमन खूप हुशार आहे. तो वरच्या क्रमाने फलंदाजी करू शकतो आणि डेथ ओव्हर्समध्ये खेळू शकतो. रोहित परत आला की, आम्हाला माहित होते की नमन याला खाली यावे लागेल. अशा सामन्यांमध्ये पॉवरप्ले खूप महत्वाचे असतात. आम्हाला काही षटके चेंडू मारता आला नाही. त्यानंतरच्या फटक्याने आम्हाला पाठलागात परत आणले.

हार्दिकचे बुमराहबद्दलचे विधान
बुमराहबद्दल हार्दिक म्हणाला, ‘बुमराहची उपस्थिती जगातील कोणत्याही संघाला खूप खास बनवते. तो आत आला आणि त्याचे काम केले. त्याला संघात घेतल्याने मला खूप आनंद झाला आहे. आयुष्यात कधीही मागे हटू नये. त्याची नेहमीच सकारात्मक बाजू पहा. बाहेर जा आणि तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला आधार द्या. आम्ही सर्वजण त्याला पाठिंबा देत आहोत, फक्त आशा आहे की निकाल आमच्या बाजूने येतील.

गोलंदाजांच्या धाडसाने आम्हाला विजय मिळवून दिला : पाटीदार

मुंबई इंडियन्सविरुद्ध १२ धावांनी रोमांचक विजय मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. सामनावीर म्हणून निवड झालेल्या पाटीदार यांनी पुरस्कार सोहळ्यात म्हटले की, ‘आमच्या गोलंदाजांनी ज्या धाडसाने गोलंदाजी केली ती कौतुकास्पद आहे. हा पुरस्कार (सामनावीर) संपूर्ण गोलंदाजी युनिटला जातो. शेवटच्या षटकात तीन विकेट्स घेणाऱ्या कृणाल पंड्याचे कौतुक करताना तो म्हणाला, ‘शेवटच्या षटकात कृणालने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती अद्भुत होती. अशा परिस्थितीत कोणत्याही संघाविरुद्ध अशी गोलंदाजी करणे खूप कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *