
पारस चव्हाण, साई बोऱहाडे, क्षितिज पवार, नयन वाणीची चमकदार कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १९ दोन दिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत जालना आणि पारसी जिमखाना यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात पारसी जिमखाना संघाने पहिल्या डावात आघाडी घेत बाजी मारली.
किंग्ज स्पोर्ट्स क्लब मैदानावर हा सामना झाला. जालना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पारसी जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना ६७.२ षटकात सर्वबाद २४५ धावा काढल्या. जालना संघाने पहिल्या डावात ४०.२ षटकात सर्वबाद १४० धावा काढल्या. पारसी जिमखाना संघाने दुसऱया डावात ४७.२ षटकात सर्वबाद १६६ धावा काढल्या. जालना संघाने निर्णायक विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, ३४ षटकात जालना संघाने नऊ बाद ८४ धावा काढल्या. हा सामना अनिर्णित राहिला.
या सामन्यात पारस चव्हाण याने आक्रमक शतक साजरे केले. त्याने १०४ धावा फटकावताना १५ चौकार व २ षटकार मारले. पवार याने ९८ व ४९ अशा खेळी करुन सामना गाजवला. साई बोऱहाडे याने २७ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. क्षितिज पवार याने ३२ धावांत चार गडी बाद केले. नयन वाणी याने ६० धावांत चार बळी घेतले.