
मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथील हनुमान क्रीडा मंडळाने आपल्या ६१व्या हनुमान जयंतीनिमित्त शालेय मुलांमध्ये कॅरम खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून १६ वर्षाखालील शालेय मुलांची मोफत कॅरम स्पर्धा गुरुवारी (१० एप्रिल) रोजी सकाळी ९.३० वाजता हनुमान क्रीडा मंडळ येथील पटांगणात आयोजित केली आहे.
या स्पर्धेत आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम ८ क्रमांक मिळवणाऱ्यांना चषक भेट देण्यात येतील. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना उत्तेजनार्थ पदके देण्यात येतील. या स्पर्धेत ज्या खेळाडूंना सहभागी व्हायचे असेल त्यांनी अविनाश महाडीक मोबाईल क्रमांक ९००४७५४५०७ या नंबरवर संपर्क साधावा. मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह देखील आयोजित केला आहे त्याचा लाभ देखील भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कमलाकर बने यांनी केले आहे.