
कल्याण : पुणे श्री शिव छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या १२व्या राज्य रग्बी अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या पुरुष संघाने उपविजेतेपद पटकावले.
साखळी सामन्यात ठाणे पुरुष संघाने सोलापूर, धुळे या संघांना पराभूत करून स्पर्धेत सर्वाधिक गुण कमावून उप उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात ठाणे संघाने सातारा संघाचा ४३-० असा पराभव करून उपांत्य फेरीत मजल मारली.
उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाणे संघाने पुणे संघास २४-१० असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामना ठाणे आणि मुंबई शहर असा झाला. या सामन्यात मुंबई शहर संघाकडून ३३-५ असा पराभव पत्करावा लागला व ठाणे जिल्हा पुरुष रग्बी संघ स्पर्धेत उपविजेता ठरला.
ठाणे संघाकडून हर्षल डोळस (कर्णधार) , आर्यन दीक्षित, अभिषेक यादव, विकास यादव, अनिकेत सिंग, निशांत चौहान, पंकज सिंग, अनिकेत सिंग, शिवप्रसाद शर्मा, अनिकेत केवने, देवेश देवाडीगा, गणेश उपाध्याय या खेळाडूंनी उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन केले. या संघास प्रशिक्षक प्रमोद पारसी, यज्ञेश्वर बागराव यांनी मार्गदर्शन केले आहे.