
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वर्षांखालील मुले आणि मुली जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन शनिवारी (१२ एप्रिल) करण्यात आले आहे.
या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेतून १५ वर्षांकालील मुले व मुलींचा जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी चार खेळाडूंची निवड संघात होणार आहे. ही निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा गरवारे कम्युनिटी सेंटर येथे शनिवारी सकाळी दहा वाजता सुरू होईल. खेळाडूंची आपली नावे ११ एप्रिलपर्यंत नोंदवावीत. नोंदणी शुल्क ३०० रुपये आहे. पहिल्या चार निवड झालेल्या खेळाडूंना ट्रॉफी दिली जाईल. खेळाडूंनी स्वतःचे बुद्धिबळ संच आणून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडू हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जन्मलेला असावा. तसेच त्याची जन्मतारीख १ जानेवारी २०१० रोजी अथवा त्यानंतरची असावी. अधिक माहितीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे मानद सचिव हेमेंद्र पटेल (९३२५२२८२६१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.