
जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांच्या हस्ते वितरण
परभणी ः परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावणाऱया १७ खेळाडूंना ९२ हजार ७२० रुपयांच्या क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांच्या हस्ते क्रीडा शिष्यवृतीचे वितरण करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य व सहभागी १७ खेळाडूंना ९२,७२० रुपये क्रीडा शिष्यवृत्ती वाटप जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ माधव शेजुळ, जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्ष रणजित काकडे, जिल्हा सचिव कैलास माने, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा सन्मान करुन क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात आली.
या कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ माधव शेजुळ म्हणाले की, मागील काळ विसरून नवीन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गेल्या काळाला विसर पाडू, आपल्या मार्गदर्शनातून खेळाडूंकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशा आशावाद आहे. परभणी जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुविधा उपलब्ध करून देऊन जिल्हा नावलौकिक प्राप्त होईल.

जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे म्हणाल्या की, खेळाडू व प्रशिक्षक यांना क्रीडा कार्यालयाचे दालन सदैव खुले राहील. पुढील शैक्षणिक वर्षात अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणारे प्रशिक्षकांचा ट्रक सुट देऊन सन्मान केला जाईल. उन्हाळी विविध क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन प्रत्येक तालुक्यात करण्यात येईल सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येईल असे गीता साखरे यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रशिक्षक गणेश माळवे, महेश काळदाते, प्रा राजू रेगे, शिवाजी खुणे, विश्वास पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश खुणे, क्रीडा अधिकारी कल्याण पोले, सुयश नाटकर, रोहन औंढेकर, धीरज नाईकवाडे आदींनी परिश्रम घेतले.
क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त खेळाडू
अर्णव महेंद्र गवळी (नेटबॉल), विशाल लक्ष्मण चौधरी (नेटबॉल), सतीश गणपत खरोडे (नेटबॉल), तेजल विष्णू शेंगुळे (नेटबॉल), रिचा संजय नवसुपे (नेटबॉल), साधना विलास पौळ (नेटबॉल), विठ्ठल अजयकुमार बोरसे (बेसबॉल), मानसी विजय कुलकर्णी (सेपक टकरा), गौरी राजू शिंदे (रग्बी), शामबाला गोरखनाथ नांदखेडकर (रग्बी), वैभव माणिकराव खुणे (रग्बी), सानिया पांडुरंग रनमाळ (तलवारबाजी), पायल अनिल आडे (कबड्डी), प्रदीप भाऊसाहेब जाधव (कबड्डी), यश भारत चव्हाण (कबड्डी), स्नेहल सुधाकर साळंके (कबड्डी).