
पुणे ः अखिल भारतीय स्तरावर क्रीडा विकासाचे कार्य करणाऱ्या क्रीडा भारती या संस्थेची सन १९९२ म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी पुणे शहरात स्थापना करण्यात आली होती. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच १२ एप्रिल २०२५ रोजी क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, संघटक, शिक्षण संस्था संचालक, क्रीडा प्राध्यापक व क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या स्नेहींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा क्रीडा भारती कार्यालय नेहरू स्टेडियम के ब्लॉक येथे १२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास पुण्यातील अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार तसेच अन्य क्रीडा पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, संघटक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे वेळी क्रीडा भारतीच्या विविध उपक्रमांची माहितीही सादर केली जाणार आहे.