
अंबाजोगाई ः अंबाजोगाई येथे अंबाजोगाई शुमा कप २०२५ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला गुरुवारी शानदार सुरुवात झाली.
इनरव्हिल क्लब ऑफ अंबाजोगाई आयोजित प्रकाशचंद सुरजमल मुथा यांच्या स्मरणार्थ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे औचित्य साधून निलेश मुथा, सुरेखा सिरसाट, जयश्री लव्हारे, अनिता सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत चार संघ सहभागी झाले असून साखळी पद्धतीने स्पर्धा होणार आहे.

निलेश मुथा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांना क्रिकेट खेळताना शिस्त संयम खूप महत्वाचा असतो. संयमी क्रिकेट खेळून मुलांनी आपल्यात असलेल्या कलागुणांना वाव द्यावा, लहान वयातच आधुनिक लेदर बॉलचे प्रशिक्षण मिळते, भविष्यात मोठे खेळाडू बनू शकतात असे मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका सुरेखा सिरसाट यांनी क्रिकेट अकॅडमीबद्दल माहिती देत सांगितले की मुलांबरोबर मुली देखील क्रिकेट खेळत आहेत ही खूप सन्मानाची बाब आहे.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुरज कांबळे. रुपेश जाधव, माही परमार, लीना किथे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मोहित परमार, अलोक भारती, यशवंत शिनगारे, शिवम पाटील, प्रणव केंद्रे, आयुष दामा परिश्रम घेत आहेत.