परेल वर्कशॉप, वीर सावकर पंढरपूर संघाची घोडदौड

  • By admin
  • April 12, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः रिशब शर्मा व वैभव बडवे सामनावीर

सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्युटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या परेल वर्कशॉप व पंढरपूरच्या वीर सावरकर संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात परेल वर्कशॉपने नॅशनल क्रिकेट अकादमीवर ८ गडी राखून विजय मिळवला. तीन बळी टिपणारा रिशब शर्मा सामन्याचा मानकरी ठरला. दुसऱ्या
सामन्यात पंढरपूरच्या वीर सावरकर संघाने सिटी पोलिस संघावर ३३ धावांनी मात केली. वैभव बडवे सामनावीर ठरला. रेल्वेचे वरिष्ठ खेळाडू प्रवीण देशेट्टी व सोनावणे यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश मालप व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. या सामन्यासाठी पंच म्हणून शुभम मुत्तुर व अनिल सलगर आणि दयानंद नवले व अनिल सलगर तर गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांना काम पाहिले.

संक्षिप्त धावफलक
१) नॅशनल क्रिकेट अकॅडमी : १९.३ षटकांत सर्वबाद १०१ (अजय सिंग २९, फैयाज मुल्ला १७, वसीम १३, रिशब शर्मा ३ बळी, रोशन परते ३ बळी, विवेक गायकवाड व अभिषेक सिंग प्रत्येकी २ बळी) पराभूत विरुद्ध परेल वर्कशॉप मुंबई : १४.२ षटकांत २ बाद १०४ (निशांत शिवलकर ५३, आमिर शेख ३१, फैजोदिन शेख २ बळी)

२) वीर सावरकर, पंढरपूर : २० षटकांत ६ बाद १६८ (वैभव बडवे ५३, मारुती कांबळे ३६, मंगेश देवमारे ३६, सदाशिव जगताप २ बळी, महेश अरकाल व श्रीकांत लिंबोळे प्रत्येकी १ बळी) विजयी विरुद्ध सिटी पोलिस : २० षटकांत ८ बाद १३५ (मानसिंग चव्हाण ५२, संदीप व्हटकर २७, दिनेश शिंगाडे व अभिजित लखेरा २ बळी, वैभव बडवे, अभिषेक लखेरा व आशिष मस्के प्रत्येकी १ बळी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *