
११ क्रीडा प्रकारांचा समावेश, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांची माहिती
नागपूर (सतीश भालेराव) ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर आणि जिल्हा क्रीडा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
१० ते १९ वर्षांखालील मुले व मुली यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास व्हावा यादृष्टीने उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर १५ ते ३० एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. या शिबिरात सॉफ्टबॉल, बॉक्सिंग, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, व्हॉलिबॉल, हँडबॉल, तलवारबाजी, मल्लखांब रोप स्किपिंग, खो-खो अशा ११ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी दिली.
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर अभ्यंकरनगर, कोराडी रोड तालुका क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, दादा रामचंद बखरू सिंधु महाविद्यालय स्केटिंग रिंग, ज्योतीबा माध्यमिक विद्यालय, यशवंत स्टेडियम, धंतोली, कोंढाळी, बापूनगर, पंचशिल नाईट स्कूल, महिला महाविद्यालय, नंदनवन, नागपूर या ठिकाणी होणार आहे.
या शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी केतन ठाकरे (९८९०९३९२५१, सॉफ्टबॉल), नितेश पटले (९०४९५२३००२, बॉक्सिंग), गणेश पुरोहित (९३२५०५१४१०, बॉक्सिंग), अजय कांबळे (९५०३८७२२६०, तटेबल टेनिस), पुरुषोत्तम दारव्हणकर (९९२१४४१४६८, जिम्नॅस्टिक्स), निशांत पाटील (९९२११११५५८, जिम्नॅस्टिक्स), उपेंद्र वर्मा (९४२३६३८५०२, स्केटिंग), नितीन कानोळे (व्हॉलिबॉल), सुनील भोतमांगे (९८२२५७७८९४, हँडबॉल), भूषण रांचलवार (७३५००७७२८७, हँडबॉल), राहुल मांडवकर (९८६०९५००३६, तलवारबाजी), प्रणय सुखदेवे (९०७५९५१८५३, मल्लखांब), आशिष देशपांडे (९५०३२७९४६८, रोपस्किपिंग), सोनाली मोकासे (८४२१४२८४५९, खो-खो) यांच्याशी संपर्क साधावा.
या शिबिरात अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी अनिल बोरावार (९४२२१५९०८३), सॉफ्टबॉल मार्गदर्शक दर्शना पंडीत (८२०८५७६२१७), हँडबॉल मार्गदर्शक भूषण इंगळे (७४४७६५४९८९), जिम्नॅस्टिक्स मार्गदर्शक निशांत पाटील (९९२११११५५८), व्हॉलिबॉल मार्गदर्शक निखिल बोबडे (७५८८५५०३९०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.