
युनिव्हर्सल वन-डे लीग ः इशांक कलवणे सामनावीर, सोहम नरवडे, पार्थ वेताळची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युनिव्हर्सल अंडर १६ एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत सीके क्रिकेट अकादमी संघाने युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी संघाचा चुरशीच्या सामन्यात १८ धावांनी पराभव केला. या सामन्यात इशांक कलवणे याने सामनावीर किताब संपादन केला.
युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन यूनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर केले आहे. सीके क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीके क्रिकेट अकादमी संघाने ४६.४ षटकात सर्वबाद १७८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीने ३१.३ षटकात सर्वबाद १६० धावा काढल्या. अवघ्या १८ धावांनी सीके अकादमीने विजय साकारला.
गोलंदाजीत इशांक कलवणे याने घातक गोलंदाजी करत २७ धावांत सहा विकेट घेऊन संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पार्थ वेताळ याने २९ धावांत तीन गडी बाद केले. स्वयम वाघमारे याने २८ धावांत दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक : सीके क्रिकेट अकादमी : ४६.४ षटकात सर्वबाद १७८ (समर्थ तोतला ५६, किर्तीराज सिंग ४६, कारक भारद्वाज नाबाद १९, पर्व पाटमी ६, कार्तिक भारद्वाज ५, लाव्य गोयल ५, पार्थ वेताळ ३-२९, स्वयम वाघमारे २-२८, शौर्य सलामपुरे २-१६, विवेक सिंग १-४१, प्रेम कासुरे १-१६, अरुण १-१०) विजयी विरुद्ध युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी : ३१.३ षटकात सर्वबाद १६० (विवेक सिंग ८, हर्षद पवार ५, सोहम नरवडे ४९, वैष्णव गायकर १३, प्रेम कासुरे ७, कृतार्थ पाडळकर १९, पार्थ वेताळ १२, स्वयम वाघमारे नाबाद २१, इशांक कलवणे ६-२७, लाव्य गोयल २-३४, हर्षित छाजेड १-११, समर्थ तोतला १-२८). सामनावीर : इशांक कलवणे.