हैदराबाद संघाचा जोरदार हल्ला, पंजाबचा विजय हिरावला

  • By admin
  • April 12, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

अभिषेक शर्माचे वादळी शतक, हेडसमवेत १७१ धावांची भागीदारी 

हैदराबाद : अभिषेक शर्माचे वादळी आणि आयपीएल स्पर्धेतील विक्रमी पहिले शतक (१४१) व ट्रॅव्हिस हेड समवेत १७१ धावांच्या भागीदारीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पंजाब किंग्ज संघावर आठ गडी (१८.३ षटकात दोन बाद १४७) राखून दणदणीत  विजय नोंदवला. पंजाबने २४५ धावसंख्या उभारल्यानंतर त्यांच्या विजयाची शक्यता होती. परंतु, अभिषेक शर्मा याने एकट्याने तुफानी फलंदाजी करुन पंजाबचा विजय हिरावून घेतला. 

सनरायझर्स हैदराबाद संघासमोर घरच्या मैदानावर विजयासाठी २४६ धावांचे आव्हान होते. तसे पाहिले तर हे लक्ष सहजरित्या गाठणे शक्य नव्हते. त्यासाठी धमाकेदार कामगिरी अपेक्षित होती. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा या सलामी जोडीने अभूतपूर्व वादळी फलंदाजी केली. खास करून अभिषेक शर्माच्या तुफानी फलंदाजीने सामन्याचे चित्र पहिल्या काही षटकांमध्येच बदलून गेले. हेड व अभिषेक जोडीने १२.२ षटकात १७१ धावांची भागीदारी करुन सामन्याचा निकाल स्पष्ट केला. चहल याने हेड याला ६६ धावांवर बाद केले. हेड याने नऊ चौकार व तीन षटकार ठोकले. 

अभिषेक शर्मा याने ४० चेंडूत विक्रमी शतक ठोकले. आयपीएल स्पर्धेतील सहावे वेगवान शतक अभिषेकने नोंदवले आहे. अभिषेकच्या वादळी हल्ल्यासमोर पंजाबचे गोलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. पंजाबची गोलंदाजी एकदम साधारण वाटत होती. आक्रमक फटकेबाजी करताना अभिषेकला नशीबाची साथ देखील मिळाली. त्याला काही जीवदाने देखील लाभली. शेवटी १७व्या षटकात अर्शदीप सिंग याने अभिषेकला बाद करण्यात यश मिळवले. प्रवीण दुबे याने त्याचा सुरेख झेल टिपला. अभिषेक याने आपल्या स्फोटक शतकी खेळीत १४ चौकार व १० षटकार मारले. त्याने अवघ्या ५५ चेंडूंचा सामना करत १४१ धावांची शानदार खेळी करुन अभिषेक तंबूत परतला. अभिषेक बाद झाला तेव्हा हैदराबादला विजयासाठी फक्त २४ धावांची गरज होती. त्यानंतर क्लासेन (नाबाद २१) व इशान किशन (नाबाद ९) यांनी आक्रमक फलंदाजी कायम ठेवत १८.३ षटकात दोन बाद १४७ धावा फटकावत शानदार विजय साकारला. 

पंजाब किंग्ज संघाची वादळी फलंदाजी 
मोहम्मद शमीने टाकलेल्या शेवटच्या षटकात मार्कस स्टोइनिसने सलग चार षटकार मारून पंजाब किंग्जचा धावसंख्या २४५ पर्यंत नेली. या हंगामातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याआधी, सिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी पंजाब संघाला जलद सुरुवात करून दिली. श्रेयस अय्यरने ८२ धावांची विक्रमी खेळी खेळली. मोहम्मद शमी डावातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शमीने ४ षटकांच्या स्पेलमध्ये १८.७५ च्या इकॉनॉमीने ७५ धावा दिल्या. तर त्याच्या नावावर एकही विकेट नव्हती. सनरायझर्स हैदराबादला जिंकण्यासाठी २४६ धावा करायच्या आहेत.

प्रथम फलंदाजी करताना प्रियांश आर्य आणि सिमरन सिंग यांनी पंजाब किंग्जला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २४ चेंडूत ६६ धावा जोडल्या, तर चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रियांश आर्य (३६) च्या रूपात पहिली विकेट पडली. त्याला हर्षल पटेलने बाद केले. प्रियांशने १३ चेंडूंच्या या खेळीत ४ षटकार आणि २ चौकार मारले. यानंतर, सिमरन सिंगच्या बॅटनेही चांगली कामगिरी केली, त्याने बाद होण्यापूर्वी २३ चेंडूत ४२ धावा केल्या. या डावात त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले.

श्रेयस अय्यरने ठोकले सर्वात जलद अर्धशतक
त्यानंतर श्रेयस अय्यर याने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस अय्यर याचे आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात जलद अर्धशतक आहे. त्याने ३६ चेंडूत ६ षटकार आणि तितक्याच चौकारांच्या मदतीने ८२ धावांची शानदार खेळी केली.

नेहल वधेरा याने २२ चेंडूत २७ धावा केल्या. त्याने १ षटकार आणि २ चौकार मारले. ग्लेन मॅक्सवेल (३) पुन्हा एकदा स्वस्तात परतला. हैदराबादने शेवटच्या षटकांमध्ये काही धावा वाचवल्या पण मार्कस स्टोइनिस याने शमीच्या शेवटच्या षटकात धावसंख्या बरोबरीत आणली. त्याने शेवटच्या ४ चेंडूंवर ४ षटकार मारले. स्टोइनिसने ११ चेंडूत ३४ धावा केल्या.

मोहम्मद शमीने ७५ धावा दिल्या
सनरायझर्स हैदराबादसाठी मोहम्मद शमी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ७५ धावा दिल्या. पॅट कमिन्सने ४ षटकांत ४० धावा दिल्या. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या इशान मलिंगाने ४ षटकांत ४५ धावा देत २ बळी घेतले. झिशान अन्सारीने ४ षटकात ४१ धावा दिल्या. सनरायझर्स हैदराबादकडून हर्षल पटेलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या, त्याने ४ षटकांत ४२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

आयपीएलमध्ये हैदराबादसाठी सर्वाधिक सलामीची भागीदारी
१८५ : जे बेअरस्टो, डी वॉर्नर विरुद्ध आरसीबी, २०१९
१७१ : अभिषेक शर्मा, टी हेड विरुद्ध पीबीकेएस, २०२५
१६७ : अभिषेक शर्मा, टी हेड विरुद्ध एलएसजी, २०२४
१६० : जे बेअरस्टो, डी वॉर्नर विरुद्ध पीबीकेएस, २०२०

आयपीएलमधील सर्वात जलद शतक 
३० : ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पीडब्ल्यूआय, बेंगळुरू, २०१३
३७ : युसूफ पठाण (आरआर) विरुद्ध एमआय, मुंबई बीएस, २०१०
३८ : डेव्हिड मिलर (केएक्सआयपी) विरुद्ध आरसीबी, मोहाली, २०१३
३९ : ट्रॅव्हिस हेड (एसआरएच) विरुद्ध आरसीबी, बेंगळुरू, २०२४
३९ : प्रियांश आर्य (पीबीकेएस) विरुद्ध सीएसके, मुल्लापूर, २०२५
४० : अभिषेक शर्मा (एसआरएच) विरुद्ध पीबीकेएस, हैदराबाद, २०२५*

Highest opening partnership for SRH in IPL
185: J Bairstow, D Warner vs RCB, 2019
171: Abhishek Sharma, T Head vs PBKS, 2025
167: Abhishek Sharma, T Head vs LSG, 2024
160: J Bairstow, D Warner vs PBKS, 2020

Fastest century in IPL
30: Chris Gayle (RCB) vs PWI, Bengaluru, 2013
37: Yusuf Pathan (RR) vs MI, Mumbai BS, 2010
38: David Miller (KXIP) vs RCB, Mohali, 2013
39: Travis Head (SRH) vs RCB, Bengaluru, 2024
39: Priyansh Arya (PBKS) vs CSK, Mullanpur, 2025
40: Abhishek Sharma (SRH) vs PBKS, Hyderabad, 2025*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *