निफाड : क्रीडा सह्याद्री फाउंडेशन निफाड यानी सालाबादप्रमाणे यावेळीही हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्थेचे सर्वच नागरिकांशी स्नेह संबंध असल्यामुळे सर्व जुने सभासद आणि हितचिंतक आणि नव्या पिढीचे खेळाडू, सभासद असे सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिवत पूजा करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी मैदान पूजन व क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर सर्वांना हनुमानाचा प्रसाद आणि दूध वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास गायकवाड, सदस्य विनोद गायकवाड, रमेश वडघुले, दत्तू रायते, चेतन कुंदे, श्याम चौधरी, प्रतीक्षा कोटकर, कीर्ती कोटकर, विजय घोटेकर विविध खेळांचे प्रशिक्षक आणि खेळाडू यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. क्रीडा सह्याद्री फाउंडेशन नाशिकच्या माध्यमातून खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्त्न राहिलेला आहे असे यावेळी अध्यक्ष विलास गायकवाड यांनी सांगितले.