
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून शुभेच्छा
नंदुरबार : पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय लॅक्रोस स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ रवाना झाला. यावेळी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना खेळ क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन करुन सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र लॅक्रोस असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा लॅक्रोस असोसिएशनच्यावतीने १४ व १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लॅक्रोस स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा लॅक्रोस संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत सबज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनियर गटांतील मुले, मुली, पुरुष आणि महिलांचे सामने खेळविण्यात येणार आहेत. संघ रवाना झाला त्यावेळी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, जिल्हा लॅक्रोस संघटनेचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, क्रीडा शिक्षक डॉ मयुर ठाकरे, मीनलकुमार वळवी, सचिव भरत चौधरी, रुपेश महाजन व राजेश्वर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
१७ वर्षांखालील मुलांच्या संघात निखिल चौरे, दुर्गेश तवर, लवेश वाघ, वेदांग चौधरी, मानव चकोर, सोहम कोळी, अंश भारती, स्वरित चौधरी, नैतिक धनगर, सहर्ष गांगुर्डे, हर्षल माळी, तुषार कोळी, ईशांत पाटील, गिरीष पाटील, अनुज काळे यांचा समावेश आहे.
१९ वर्षांखालील मुलींच्या संघात कन्या मराठे, कृष्णाली बिर्ला , राजनंदिनी पाटील, अक्षरा कापडिया, मृणालिनी पाडवी, अंकिता चव्हाण, राजश्री राठोड यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
१९ वर्षांखालील मुलांच्या संघात राजेश माळी, गौरव माळी, ओम मराठे, हर्षल बेडसे, रोहित पगारे, तेजस चौधरी, ओम पवार, मयूर पाटील, कुणाल धनगर, जतिन वाडीले, श्याम पाटील, हर्षल नेतके, ओम ठोसर, गौरव चौधरी, मनीष गोयकर यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंकडून पुणे येथे होणार्या स्पर्धेत लक्षवेधक कामगिरीची अपेक्षा आहे.