
क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे आयोजन
जळगाव ः भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त जळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जयभीम पदयात्राचे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.

जयभीम पदयात्रा कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, विभागीय प्रमुख रमेश जेठानी, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे प्रणव कुमार झा, जळगाव महानगर पालिकेचे (कॅफो) चंद्रकांत वानखेडे, नगर सचिव सुनील गोराणे, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त सुमित जाधव, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील हे अधिकारी उपस्थित होते.
जयभीम पदयात्रा कार्यक्रमामध्ये विविध शाळांतील ५०० विद्यार्थी, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र जळगाव मधील खेळाडू, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, शासकीय मिलिटरी वसतिगृहचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. जयभीम पदयात्रेस आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी जळगाव यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करून पूजन केले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी संविधानाचे वाचन केले. सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
जयभीम पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू झाली व रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संपन्न झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या पदयात्रींकरीता इकरा उर्दु हायस्कूलचे चेअरमन एजाज मलिक यांच्यामार्फत पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना टोप्या देण्यात आल्या.
या कार्यक्रमास इकबाल मिर्झा, वसीम मिर्झा, शहजाद शेख, रणजीत पाटील, राहुल चौधरी, मीनल थोरात, विशाल बोडके, सचिन निकम, किशोर चौधरी, चंचल माळी, सोनल विचवेकर, संजय माहिरे, उमेश मराठे, विनोद कुलकर्णी, विनोद माने यांचे सहकार्य लाभले. जय भीम पदयात्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव यांनी केले. नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डागर यांनी आभार मानले.