
नाशिक ः येवला येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा नाशिक विभागीय शिक्षक मेळावा व सन्मान सावित्रीच्या लेकींचा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक संघटना महाराष्ट्र राजाध्यक्ष आकाश तांबे हे होते.
स्त्रियांचा सन्मान केला तर देशाच्या जडणघडणीवर त्याचा खूप चांगला परिणाम होतो म्हणून नेहमीच स्त्रीसन्मान कार्यक्रमांचे आयोजन झाले पाहिजे. प्राथमिक शिक्षकांना देखील पदवीधर शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार मिळावा ही देखील मागणी केली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, महेंद्र काळे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, मनीषा वाकचौरे, रवींद्र पालवे, प्रभाकर पारवे, बाजीराव प्रज्ञावंत, राहुल गायकवाड, महेश अहिरे, राजेंद्र वाघमारे, राहुल गायकवाड, बापू साळुंखे, अजीज भाई आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार सावित्रीच्या लेकींचा या उपक्रमांतर्गत भावना शिरसाट (नांदगाव), अंजना थोरात (सिन्नर), कल्पना माने (निफाड), संध्या देवरे (चांदवड(, प्रतिभा शार्दुल (बागलाण), मीनाक्षी आहेर (कळवण), सारिका अहिरे (मालेगाव), आरती वाघमोडे (सुरगाणा), मेघना गावित (दिंडोरी), प्रज्ञा तुपलोंढे (नाशिक), वर्षा चौधरी (इगतपुरी), मंगला बोरसे (देवळा), पार्वती गावित (पेठ), भारती घोलप (त्रंबकेश्वर) यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी येवला तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून उपक्रमशील शिक्षिका म्हणून जयश्री पालवे, आशा पगारे, अमृता वाडेकर, ज्योती निकुंभ, आशा पैठणकर, प्रियंका ससे, मनीषा तांगडे, ज्योती खांबट, रागिने कापरे, योगिता जगताप, मीनल बोडके, अर्चना गायकवाड, संगीता येवले, मीनल बोडके, पल्लवी राऊत, दीपा पवार, बीबी बद्दल अहमद आदींना गौरविण्यात आले. वनिता वाघ याची माध्यमिक विभागाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी तर नम्रता ससाणे यांची येवला तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास शिक्षक समितीचे रणजीत परदेशी, दीपक थोरात, चंद्रकांत जानकर, बाबासाहेब बेरगळ, संतोष चव्हाण, केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर दंडगव्हाळ, रमेश उगले, हरिभाऊ खरवटे, दादासाहेब बोराडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक येवला तालुका अध्यक्ष सोमनाथ खळे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन वाव्हळ, संतोष सोनवणे, प्रियांका वाघ, रेखा बाविस्कर यांनी केले व जिल्हाध्यक्ष गोकुळ वाघ यांनी आभार मानले. शिक्षक संघटनेचे पुंजाराम पगारे, शंकर अहिरे, दिनकर दुनबळे, शरद अहिरे, अण्णा पवार, दीपक कुराडे, पांडुरंग भालेराव, सुरेश वाघ, संतोष पठारे, राजेंद्र वाघ, बाबासाहेब धीवर, महेश वाघ, नितीन गावित, अमर गावित,अर्जुन घुसाळे, राहुल तेलोरे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षिका बंधुभगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.