
पुणे ः भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शोभा पंडित, भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार रेखा भिडे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आकांक्षा आगवणे अशा अनेक नामवंतांच्या उपस्थितीत क्रीडा भारतीचा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
नेहरू स्टेडियम येथील क्रीडा भारतीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पुणे शहर व परिसरातील साडेतीनशेहून अधिक क्रीडाप्रेमी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार, तेनसिंग नोर्गे पुरस्कार विजेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू सुनील बाब्रस व सुजाता बाब्रस, ज्येष्ठ गिर्यारोहक व ख्यातनाम अभिनेते यशोधन बाळ इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होता. क्रीडा भारती संस्थेचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, प्रांत अध्यक्ष विजय पुरंदरे, उपाध्यक्षा शकुंतला खटावकर यांच्यासह संस्थेचे शैलेश आपटे, चंद्रशेखर कुलकर्णी, विजय रजपूत, हरीश अनगोळकर, अनुजा दाभाडे, दीपक मेहेंदळे, जयंत गोखले, राजेंद्र शिदोरे, मनाली देव आदी पदाधिकाऱ्यांनी या पाहुण्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमास उपस्थितांमध्ये डॉ प्रवीण दबडगाव, महेश करपे, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, विजय भालेराव, मिहिर प्रभुदेसाई, जयंत किराड, दीपक मराठे, अशोक वझे, शिरीष किराड, पराग ठाकूर, दिनेश गेरूला, अश्रीन उपाध्याय, राजेंद्र हेजिब, अलका पेटकर, माधुरी शहस्त्रबुद्धे, सायली केरीपाले, वासंती सातव, गुरबन्स कौर, नीता तळवलीकर, अनिल वाल्हेकर, प्रसाद खटावकर, गोपाळ मिरजकर, डॉ मधुसूदन झंवर, सुहास वाघ, अरविंद पटवर्धन, शैलेश टिळक, मनोज एरंडे, सचिन गोडबोले, शिरीन गोडबोले, सुभाष बोधे, वसंत गोखले, शरद केळकर, सुनील नेवरेकर, राजेंद्र कोंडे, सत्यजीत शिंदे, श्रीनाथ आगवणे, बाळासाहेब साने, पुणे विद्यापीठाचे विद्यमान क्रीडा संचालक प्रा सुदाम शेळके, प्राध्यापक एल टी देशमुख तसेच प्रा एस एन करंदीकर, प्रा पुरुषोत्तम पटेल, प्रा राघव अष्टेकर, प्रा व्यंकटेश वांगवाड, डॉ पी जी धनवे. डॉ अरुण दातार व डॉ आरती दातार, बालेवाडी क्रीडा अधिकारी सायली केरीपाळे, सहाय्यक संचालक महाराष्ट्र राज्य क्रीडा अधिकारी जनक टेकाळे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुदाम कदम, विशेष क्रीडा अधिकारी प्रा रणजीत चामले इत्यादी नामवंत व्यक्तींचा समावेश होता.