मुंबई, छत्रपती संभाजीनगर, रायगड, नांदेड, भंडारा संघांची आगेकूच

  • By admin
  • April 14, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

राज्य नाइन ए साइड फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्य नाइन ए साईड फुटबॉल सब ज्युनियर मुले मुली, ज्युनियर मुले मुली स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.

विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फुटबॉल प्रशिक्षक डॉ हाश्मी सय्यद मसुद हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाईन ए साईड हौशी फुटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे उपस्थित होते. महासचिव प्रा. एकनाथ साळुंके यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी आर खैरनार यांनी केले.

या कार्यक्रमात राज्य संघटना, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास दिनेश म्हाला (अमरावती), लालसिंग यादव (नागपूर), प्रमोद साहा (मुंबई), मेघाश शिंदे (जळगाव), अलेस्टर सिमॉस (जळगाव), सुशांत जऊळे (रायगड), समीर सय्यद (नांदेड), बद्रुद्दीन सिद्दिकी (छत्रपती संभाजीनगर) यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेत राज्यातून २१ संघांनी सहभाग घेतला होता. जवळपास ४०० मुले-मुली सहभागी झाले आहेत. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर संघाने नागपूर संघाचा २-० असा पराभव केला. मुंबई संघाने धुळे संघावर २-० ने मात केली. नांदेड संघाने भंडारा संघावर २-० असा सहज विजय साकारला. जळगाव संघाने अमरावती संघावर २-० ने विजय मिळवला.

१९ वर्षातील मुलांच्या गटात मुंबई संघाने रायगड संघावर २-० अशी मात केली. छत्रपती संभाजीनगर संघाने नागपूर संघाचा ४-० असा धुव्वा उडवला. मुंबई संघाने धुळे संघाचा २-० असा पराभव करत आगेकूच केली. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात जळगाव संघाने रायगड संघावर २-० असा विजय मिळवला.

स्पर्धा आयोजन समिती सचिव अभिजीत एकनाथ साळुंके यांनी स्पर्धेचे नियोजन केले. पंच म्हणून बद्रुद्दीन सिद्दिकी, लाईक खान, सुलतान खान, अजमत खान, सोहेल खान समीर सय्यद, अलेस्टर यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. एकनाथ साळुंके, बद्रुद्दिन सिद्दिकी, डी आर खैरनार, लाईक खान, सागर तांबे, सुलतान खान, अश्रफ पठाण, वैभव सोनवणे, महेंद्र गायकवाड स्वप्निल सरोदे, वैभव सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *