पालघर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारिणी जाहीर

  • By admin
  • April 14, 2025
  • 0
  • 39 Views
Spread the love

महासंघाच्या मुंबई विभाग संपर्क प्रमुखपदी प्रमोद वाघमोडे यांची नियुक्ती

ठाणे ः महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पालघर जिल्हा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर तालुका बोईसर येथील सायली रिसॉर्ट मध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक यांची सहविचार सभा पार पडली.

या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी पालघरचे खासदार डॉ हेमंत सावरा हे होते. यावेळी खासदार हेमंत सावरा यांच्या हस्ते महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देण्यात आले याप्रसंगी पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी भागडे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय पाटील, अशोक वडे, पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मुख्य क्रीडा अधिकारी गिरीश इरकर, बोईसरचे सरपंच आनंद सोमण, उपसरपंच अर्चना पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंकुश आहेर, ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप ढमाले, संघटनेची क्रियाशील कार्यकर्ते समीर परब आदी मान्यवर व पालघर जिल्ह्यातील २२७ क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण असून जिल्ह्यातील अनेक खेळाडूंमध्ये चांगले क्षमता आहेत अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच क्रीडा चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी, या क्षेत्रातील असलेल्या समस्या सोडवण्यासाठी पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ काम करेल असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले. लवकरच प्रत्येक तालुक्याची क्रीडा शिक्षकांची कार्यकारिणी जाहीर केली जाईल असे पाटील यांनी सांगितले.

या प्रसंगी राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांनी राज्य महासंघ १९८० पासून कार्यरत असून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आजपर्यंत महासंघाने अनेक असे यशस्वी लढे देऊन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या समस्या दूर केल्या आहेत. नव्याने पालघर जिल्हा राज्याशी संलग्न झाल्याने काम करण्यास अधिक बळ मिळेल अशी आशा व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सभेत संबोधित करत असताना प्रमोद वाघमोडे यांनी श्वास क्रीडा- ध्यास क्रीडा या टॅगलाईन खाली क्रीडा शिक्षकांची ही चळवळ आता पालघर मधून सुरू झालेले आहे आणि ती संपूर्ण राज्यभर पसरवायचे आहे. महाराष्ट्राचा क्रीडा विकास करूया असे आवाहान सहविचार सभेमध्ये उपस्थित असलेल्या क्रीडा शिक्षकांना करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या ठाणे जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर महासंघाच्या कार्याचा विस्तार पालघर व रायगड जिल्ह्यात वाढवण्याचे शिवधनुष्य प्रमोद वाघमोडे यांनी यशस्वीपणे हाती घेतले हे लक्षात घेऊन राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांनी त्यांची मुंबई विभाग संपर्कप्रमुख पदी निवड केली तसेच पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारणी जाहीर केली व सर्व पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देण्यात आले.

पालघरचे नवनियुक्त पदाधिकारी

अध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष अरविंद ठाकरे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पळसुले, उपाध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पारगावकर, उपाध्यक्ष अरुणा सावे, सचिव आशिष पाटील, खजिनदार योगेश चौधरी, सहसचिव मनीषा तारवी, निलेश गायकवाड, सहसचिव किरण पवार, महिला आघाडी प्रमुख रुचिता ठाकूर, कार्यालयीन सचिव मारुती थोरात, संघटक नरेंद्र घरत, सदस्य संजय कीणी, जयेश वैती, रमाकांत घरत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *