
कन्नड ः विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ कन्नड येथे महावीर जयंतीनिमित्त जन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तालुक्यातील २० जणांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये सुरेश डोळस व विनोद साळुंखे या जोडीने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत अविनाश गायकवाड आणि डॉ कैलास मोती यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी वासडी गावचे माजी सरपंच राहुल पाटणी, प्रकाशचंद पाटणी, पुनम पाटणी, मयूर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड तालुका क्रीडा संकुल समितीचे सदस्य व मार्गदर्शक प्रवीण शिंदे, एमआरएफ डीलरशिपचे संदीप शिंदे, पशुधन अधिकारी डॉ विजय इटोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी खेळाडूंना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा आयोजनासाठी धवल पाटणी, मयूर पाटणी, एजाज शहा, विशाल दांडेकर आदींनी परिश्रम घेतले.