
छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा १५ वर्षांखालील मुले व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ चाचणी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या निवड चाचणी स्पर्धेतून प्रत्येकी चार मुले व मुली असा खेळाडूंचा जिल्हा संघ पारितोषिक वितरण प्रसंगी घोषित करण्यात आला. विजयी खेळाडूंनी जल्लोषात चषक स्वीकारला. विजयी संघ हा आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या प्रसंगी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेन्द्र पटेल, केंद्र व्यवस्थापक रमाकांत राउत्तले, विलास राजपूत आदी मान्यवर तसेच पालक, बुद्धिबळ प्रेमी हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वयोगट ७ ते वयोगट १३ वर्षांखालील विजयी खेळाडूंना चषक देण्यात आला. त्यात श्रेया शेळके, अनाईका कुमारी, वल्लभ कुलकर्णी, कृष्णा ठोंबरे, धैर्य साळवे, स्वरा लढ्ढा, निती ललवाणी, तनिष कुमार, आयांश माछर, राजनंदिनी ठोंबरे, जान्हवी देशमुख, आरव वानखेडे, श्रीकांत शिंदे, साकला लब्धी, उन्मेशा मनुरकर, प्रथमेश कोल्हे, आर्यन सोनवणे या खेळाडूंचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर बुद्धिबळ संघ
मुलींचा संघ ः भूमिका वाघले, श्रावणी नानकर, समृद्धी कांबळे, रेणुका गोविंदवार.
मुलांचा संघ ः विहंग गांगण, अर्णव तोतला, आयुष कोटेचा, देवांश तोतला.