
पुणे ः पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीग गोल्फ स्पर्धेत शुभान सनराइजर्स या संघाने प्रतिष्ठेचा ऑक्सफर्ड गोल्फ चषक जिंकला.
राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीग गोल्फ स्पर्धेत एकूण बारा संघ आणि तीनशे खेळाडू सहभागी झाले होते. शेवटच्या दिवशी चार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. त्यात सर्व संघापेक्षा अतिशय दिमाखदार असे गोल्फ खेळाचे प्रदर्शन करीत या वर्षीच्या अतिशय नावजलेला ऑक्सफर्ड गोल्फ चषक शुभान सनरायझर्स या संघाने पटकावला आहे. यावेळी गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर, एस गोल्फिंगचे आदित्य मालपाणी, संयोजक रोहन सेवलेकर, कौशिल वोरा यासह राष्ट्रीय खेळाडू व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शुभान सनरायझर्स संघ ऑक्सफर्ड गोल्फ चषकाचा मानकरी ठरला. या संघाने दहा लाखांचे पारितोषिक मिळवले. विजयी संघात प्रमुख खेळाडू जॉन विल्कॉक्स, यश वाधवन, अन्वय खन्ना, बिजय लेंका, दीपक द्विवेदी, यश शहा, दीपक आनंद, अनिरुद्ध इंदूरकर, गिरीश शिळमकर, दीपक कुमार, अभिजीत गानू, किरण प्रकाश शहा, यशवंत झांजगे, जितेंद्र शहा, अनुराधा बंबवाले हे विजयी संघात सहभागी होते. . ईगल फोर्सेस संघाने उपविजेता पटकावले. ईगल संघाने साडेसात लाखांचे पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक पुना लायन्स संघाने मिळवित पाच लाखांचे बक्षीस मिळवले तसेच रोअरिंग टायगर्स नागपूर संघाने तृतीय क्रमांक मिळवित तीन लाखांचे बक्षीस मिळवले.

गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेत एकूण १२ संघ आणि १८० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुण्यातील प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे पार पडला.
अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमिअर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध संघ सहभागी होत आहेत. पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीगचे सर्व सामने पार पडले. त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीगमध्ये पुणेकरांना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळाले. या राष्ट्रीय लीग गोल्फ सामन्यासाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.
या ऑक्सफर्ड प्रीमियर लीगमध्ये ईगल फोर्सेस, बिनधास्त बॉईज, सुलतान स्विंग्स, ब्लिस्ट्रिंग बर्ड्स, झिंगर्स, ग्रीन गॅडीटर्स, सुझलोन ग्रीन्स, रोरिंग टायगर्स, पुना लायन्स, सुब्बन सनरायजर्स, द लीगशी क्लब, बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले होते .