
भारतीय महिला हॉकी संघ लवकरच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. हॉकी इंडियाने २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा केली आहे. या संघात पाच नव्या चेहऱयांचा समावेश आहे. वाराणसीतील गंगापूर येथील रहिवासी पूजा यादव हिची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ सदस्यीय महिला संघाची घोषणा झाली. यात पहिल्यांदाच वरिष्ठ संघात पाच नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्योती सिंग, सुजाता कुजूर, अजमिना कुजूर, पूजा यादव आणि महिमा टेटे अशी या पाच खेळाडूंची नावे आहेत. या दौऱ्यात भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. सलीमा टेटे संघाचे नेतृत्व करणार असून नवनीत कौरला उपकर्णधार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ, ऑस्ट्रेलिया येथे पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. वाराणसीतील गंगापूरची येथील रहिवासी पूजा यादवची भारतीय महिला हॉकी संघात निवड झाली. मिडफिल्डर पूजा ही वाराणसीची पहिली महिला हॉकी खेळाडू बनली आहे आणि तिला भारतीय महिला हॉकी संघात स्थान देण्यात आले आहे. पूजा यादवच्या या यशात तिच्या आई-वडिलांच्या कठोर परिश्रमांचा मोठा वाटा आहे. तिचे वडील महेंद्र यादव हे दूथ विकायचे. आई कलावती देवी या ग्रहिणी आहेत. तिला सहा बहिणी व एक भाऊ आहे. यात पूजा ही पाचव्या क्रमांकावर आहे. ऑलिम्पियन ललित उपाध्याय यांचा व्हिडिओ पाहून पूजा यादव ही हॉकी खेळाकडे आकर्षित झाली. गंगापूर येथून पूजा यादव हिने आपला हॉकी प्रवास सुरू केला. एसएआय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिचा खेळ खूप लवकर सुधारला. सध्या लखनौ साई वसतीगृह येथे पूजा आहे. पूर्वांचल विद्यापीठ (जौनपूर) येथून पूजा बीए करत आहे. हॉकी वाराणसीचे अध्यक्ष डॉ ए के सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमुळे हा खेळ विकसित होत आहे. पुजाची निवड झाल्यामुळे आता मुली हॉकी खेळाकडे अधिक आकर्षित होतील. हॉकी वाराणसीचे सचिव केबी रावत म्हणाले की, १४ एप्रिल २०२५ हा दिवस बनारसच्या हॉकी खेळाडूंसाठी एक संस्मरणीय क्षण ठरेल. पहिल्यांदाच वाराणसीतील महिला हॉकी खेळाडूंना निळी जर्सी घालण्याची संधी मिळाली आहे. काशीची पूजा यादव आता निळ्या जर्सीत भारतीय हॉकी संघातून देशाचे प्रतिनिधित्व करताना लवकरच दिसणार आहे. पूजाची भारतीय संघातील निवड ही वाराणसीतील महिला खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणा देणारी ठरेल याची खात्री वाटते.