
हिंगोली : ३०वी सब ज्युनिअर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा संगरूर (पंजाब) येथे नुकतीच संपन्न झाली. या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत हिंगोली येथील एकता युवा स्पोर्ट्स फाऊंडेशनचा खेळाडू ज्योतीरादित्य सोपान शिंदे याने सांघिक सुवर्णपदक प्राप्त करून हिंगोली जिल्ह्यासह एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशनचा नावलौकिक केला आहे.
या यशामध्ये एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हिंगोलीचे बेसबॉल या खेळाचे मुख्य प्रशिक्षक विशाल कदम यांचा सिंहाचा वाटा आहे. या यशाबद्दल हिंगोली जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून या कामगिरीबद्दल एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशनचे पदाधिकारी तथा सचिव गजानन आडे, प्रकाश अडकिने, दीपाली आडे, समृद्धी कदम, ज्ञानेश्वर माने, कृष्णा कदम, बजरंग कदम, गोपाल कपाटे, गोकुळ आडे, पवन राठोड, लक्ष्मण राठोड यांच्या वतीने खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.