
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः समीर शेख सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत मध्य रेल्वे ब संघाने टाइम्स इलेव्हन ब संघावर २ गडी राखून विजय मिळविला. अष्टपैलू कामगिरी करणारा समीर शेख (३-१९) सामन्याचा मानकरी ठरला.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या दुसऱ्या सामन्यात हैदराबाद कर्नाटक क्रिकेट क्लबने अभिसिद्ध क्लबला २ गडी राखून पराभूत केले. अर्धशतक झळकावणारा सी मारुती सामनावीर ठरला. हे पुरस्कार एससीएसटी असोसिएशनचे सचिन बनसोडे व रेल्वे इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी किशोर पिल्ले यांच्या हस्ते देण्यात आले. प्रत्येक सामनावीरचे पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून चिराग शाह व मजहर मंगोली आणि अशोक डोंबाळे व सचिन गायकवाड यांनी तर गेनबा सुरवसे यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.

संक्षिप्त धावफलक : १) टाइम्स इलेव्हन (ब) : १८.१ षटकांत सर्वबाद ११३ (मकरंद बसवंती ४७, अमरदीप शिंदे १५, रवी माने १२, समीर शेख व संभाजी चौधरी ३ बळी, राज शाहपुरकर २ बळी) पराभूत विरुद्ध सेंट्रल रेल्वे (ब) : १९.१ षटकांत ८ बाद ११५ (दिगंबर माने नाबाद ४५, विक्रम माने ३१, समीर शेख १९, सचिन गायकवाड ३ बळी, गणेश जाधव २ बळी, अमरदिप शिंदे व अयुब पट्टेवाले प्रत्येकी १ बळी).
२) अभिसिद्ध क्रिकेट क्लब : २० षटकांत ८ बाद १४४ (आदित्य तिकटे ३६, किरण डिग्गे २४, कुशाल माळी २३ धावा, मोहंमद खादिर व राहुल राठोड २ बळी, सी मारुती, कुणाल जी के, व्ही नितेश प्रत्येकी १ बळी) पराभूत विरुद्ध एचके सीसी : २० षटकांत ८ बाद १४५ (सी मारुती ५५, नागराज १६, व्ही नितेश १३, लखन गावडे, नितीन गायकवाड व अक्षय भांबिरे प्रत्येकी २ बळी).