बुद्धिबळ स्पर्धेत अक्षज पाटीलला विजेतेपद 

  • By admin
  • April 16, 2025
  • 0
  • 302 Views
Spread the love

विक्टोरियस चेस अकादमीतर्फे रिलायन्स मॉल एरंडवणे येथे स्पर्धेचे आयोजन 

पुणे ः विक्टोरियस चेस अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ६ रविवार रॅपिड बुद्धिबळ सिरीज स्पर्धेत ओपन गटात अक्षज पाटील याने विजेतेपद पटकावले. 

एरंडवणे येथील रिलायन्स मॉल येथे ही बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात घेण्यात आली. रिलायन्स मॉल एरंडवणे हे या स्पर्धेचे अधिकृत व्हेन्यू पार्टनर आहेत. या स्पर्धेत सर्व वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला व खेळाचा आनंद घेतला. व्हीसीएतर्फे रिलायन्स मॉल एरंडवणे यांचे आभार मानण्यात आले. 

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुण्यातील प्रसिद्ध बुद्धिबळपटू व प्रशिक्षक अभिजीत जोशी, पुष्कराज बेडेकर, व्हीसीए संस्थापक व संचालक कपिल लोहाना, रिलायन्स मॉल एरंडवणे मॅनेजर प्रतीक वाखारिया यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अंतिम निकाल 
ओपन गट ः १. अक्षज पाटील (५०००, ट्रॉफी), २. आर्यन करमळकर (३०००, ट्रॉफी), ३. सिद्धांत गायकवाड (२५००, ट्रॉफी). 

अंडर १५ ः १. परम समीर जालान ( ९००, ट्रॉफी), २. अर्णव तापकीर (ट्रॉफी), ३. अंश अभिषेक नायर (सुवर्णपदक). 

अंडर १३ ः १. लव्या सुरेश अग्रवाल (९००, ट्रॉफी), २. विनय सारंगन (ट्रॉफी), ३. निहांत गायकर (सुवर्णपदक). 

अंडर ११ ः १. कविश लिमये (९००, ट्रॉफी), २. अरिव कामत (ट्रॉफी), ३. राघव पावडे (सुवर्णपदक). 

अंडर ९ ः १. निवान अग्रवाल (९००, ट्रॉफी), २. राम जोशी (ट्रॉफी), ३. शिवम निगडे (सुवर्णपदक). 

अंडर ७ ः १. प्रितिका नंदी (९००, ट्रॉफी), २. निश्चंथ रामकुमार (ट्रॉफी), ३. रियांश अमित पिटाले (सुवर्णपदक). 

सर्वोत्तम महिला खेळाडू ः १. कनिका साने (९००, ट्रॉफी), २. सम्रादनी पाटील (ट्रॉफी), ३. तन्वी कुलकर्णी (सुवर्णपदक). 

सर्वोत्तम व्हीसीए खेळाडू ः १. प्रथमेश देवडीकर (९००, ट्रॉफी), २. मिहीर रामपल्ली (ट्रॉफी), ३. प्रतम अमित वारंग (सुवर्णपदक).

सर्वोत्तम ज्येष्ठ खेळाडू ः भालचंद्र कुलकर्णी (ट्रॉफी), ऋद्धेश कुलकर्णी (ट्रॉफी), इशिता महेश चौरे (ट्रॉफी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *