
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः मोहित राय, जावेद अहमद सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल क्रिकेट
स्पर्धेत साऊथ सोलापूर ओल्ड संघाने कुर्डुवाडीच्या जयहिंद क्लब संघाला ७१ धावांनी पराभूत केले. मोहित राय सामन्याचा मानकरी ठरला.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात ख्वाजा बंदेनवाज क्रिकेट क्लब संघाने पंढरपूरच्या वीर सावरकर पंढरपूर संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. जावेद अहमद हा सामनावीर ठरला. सामनावीर पुरस्कार रेल्वे इन्स्टिट्यूटचे खजिनदार विक्रांत पवार व राजा पटेल यांच्या हस्ते देण्यात आले. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून सचिन गायकवाड व नवीन माने आणि अतिक शेख व शोएब शेख तर गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले.

संक्षिप्त धावफलक ः १) साऊथ सोलापूर ओल्ड : २० षटकांत ७ बाद १६९ (मोहित राय नाबाद १०२, अमोल अंगडी १२, प्रद्युम्न साटव व अभिजित मुळे २ बळी, सचिन सुरवसे व कोरे नागेश प्रत्येकी १ बळी) विजयी विरुद्ध जय हिंद कुर्डूवाडी ः २० षटकांत ८ बाद ९८ (सचिन गोडसे नाबाद ३८, विल्सन काळे १७, अभिजित मुळे १५, लक्ष्मण कावळे व विश्वनाथ मुंढे २ बळी, अमोल लाहासे, मोहित राय व रोहित देशमुख प्रत्येकी १ बळी).
२) वीर सावरकर, पंढरपूर : १५.१ षटकांत सर्वबाद ७७ (दिनेश शिंगाडे १९, गौरव गायकवाड १८, वैभव बडवे ११, जावेद अहमद ३, शीतल कुमार व यासिर मोमीन २ बळी, सईद जहागीरदार, जकवान अहमद प्रत्येकी १ बळी) पराभूत विरुद्ध केबीएनसीए : ८.४ षटकांत ३ बाद ७९ (सईद जहागीरदार नाबाद ४६, मिर्झा वसीम बैग २७, महितेश वाघेला २ बळी, गणेश चव्हाण एक बळी).