
सोलापूर ः मणिपूर राज्याचा भारतीय प्राचीन युद्ध कला भारतीय सरित सराक महासंघ यांच्या मान्यतेने व सरित सराक स्वदेशी मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने सोलापूर शहर येथे राज्य प्रशिक्षण कार्यशाळेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
दुसरी राष्ट्रीय सरित सराक मार्शल आर्ट स्पर्धा १८ ते २० एप्रिल या कालावधीत गीता भवन, कलानुर, शहर रोहतक, हरियाणा येथे होणार आहे. अनहबा व अनिसुभा चायनबा या क्रीडा प्रकारात सब ज्युनियर व ज्युनियर व सीनियर मुले व मुली यांची निवड करण्यात आली. या सर्व खेळाडूंना मुख्य शिक्षक आप्पासाहेब महादेव चिंचकर यांचे मार्गदर्शन लाभले असून राज्य संघटनेचे अध्यक्ष तुकाराम झगडे, राजीव देशपांडे, बाबासाहेब चिंचकर व राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष गुरु नामेरुखपम जीबनसिंग (मणिपूर) व सचिव राजू सिंग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचा संघ
सिद्धार्थ मुकाने, लिंगराज हाताळे, आदित्य बंद पट्टे, अथर्व बिद्री, सार्थक गायकवाड, कृष्ण जानकर, रितेश बगले, अबूबकर शेख, समर्थ पाटील, आमियान शेख, सुफियान शेख, विघ्नेश बुरा, यश सरवदे व मनीष लिंबोळे.
मुलींचा संघ ः दर्शना नराल, सृष्टी गिरे, पूर्वी साठे, ऋतुजा बगले, विद्या साखरे, अक्षय पुल्ली, संजीवनी नडगम, विद्या गायकवाड, राजनंदिनी पवार, स्नेहा बोडू, अनुजा जानकर व अश्विनी देवकर.